Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो… टीम इंडियाच्या बसमध्ये सापडली काडतुसे, खेळाडूंमध्ये घबराटीचे वातावरण…!

मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली.. वेस्ट इंडिजनंतर श्रीलंका संघालाही टीम इंडियाने क्लिन स्विप दिला.. त्यानंतर टीम इंडिया येत्या 4 मार्चपासून श्रीलंकेविरुद्ध 2 कसोटी सामने खेळणार आहे.. मात्र, त्यापूर्वीच टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आली आहे..

Advertisement

मोहालीतील ‘पीसीए क्रिकेट स्टेडियम’वर येत्या 4 मार्चपासून पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यासाठी खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था चंदीगड येथील ललित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. भारतीय कसोटी संघातील बहुतांश खेळाडू चंदीगडला पोहोचले आहेत. दरम्यान, शनिवारी (ता. 26) टीम इंडियाच्या खेळाडू ‘पीसीए क्रिकेट स्टेडियम’वर सरावासाठी निघणार होते. खेळाडू बसमध्ये चढण्यापूर्वी बसची तपासणी करण्यात आली असतान, बसमध्ये दोन काडतुसे आढळून आली. सुरक्षा रक्षकांनी तातडीने ही काडतुसे जप्त केली आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला.

Advertisement

बसमध्ये सापडलेली रिकामी काडतुसे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. खेळाडूंना स्टेडियमकडे सोडणाऱ्या बसमध्ये ही काडतुसे सापडल्याचे सांगण्यात आले.. ही काडतुसं पिस्तुलाची असल्याचं बोललं जातं. खेळाडूंच्या प्रवासासाठी ‘तारा ब्रदर्स’ची ही बस आयटी पार्कमधील हॉटेल ललितच्या बाहेर उभी होती. जिथे दोन्ही संघातील खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काडतुसे सापडल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह तेथे शोध घेतला. सोबतच मोहालीतील पीसीए क्रिकेट स्टेडियमचीही कसून तपासणी करण्यात आली. या प्रकरणामुळे टीम इंडियातील खेळाडूंच्या सुरक्षेबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, आर. अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, शुभमन गिल, हनुमा विहारी, प्रियांक पांचाळ, उमेश यादव, जयंत यादव, सौरभ कुमार आणि केएस भरत यांसारखे खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ‘हॉटेल ललित’मध्ये थांबले होते. त्यानंतर माजी कॅप्टन विराट कोहली, विकेटकिपर ऋषभ पंतही शनिवारीच संघात सामील झाले.

Advertisement

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहाली क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.. नंतर टीम इंडिया दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी बंगळुरूला रवाना होईल. या कसोटी मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारताची ही पहिलीच कसोटी मालिका आहे.

Advertisement

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक… ‘या’ कारणांमुळे मुंबई पोलिसांकडून कारवाई..!
T-20 Cricket : श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ आणि खेळाडूंचे झाले हे विक्रम

Advertisement
Advertisement

Leave a Reply