Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक… ‘या’ कारणांमुळे मुंबई पोलिसांकडून कारवाई..!

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला रविवारी (ता. 27) मुंबई पोलिसांनी अटक केली. मुंबईतल्या वांद्रे परिसरात कांबळीने दारुच्या नशेत गाडी चालवून दुसऱ्या गाडीला ठोकर मारली. त्यानंतर त्याची गाडी तो राहत असलेल्या सोसायटीचे गेटवरही आदळली.. याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर वांद्रे पोलिसांनी कांबळीला अटक केली. नंतर जामीनावर त्याची सुटका करण्यात आली..

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी दारूच्या नशेत गाडी चालवत होता. त्याच्याविरोधात एकाने तक्रार केली. त्याचं म्हणणं होतं, की नशेत असलेल्या कांबळीने आपल्या गाडीला टक्कर मारली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी कांबळीला अटक केली. दरम्यान, कांबळीने आपल्या सोसायटीच्या गेटलाही गाडी ठोकल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. नंतर त्याला जामीनही मिळाला. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

Loading...
Advertisement

विनोद कांबळी वांद्रे येथे ज्या इमारतीत राहतो, त्याच इमारतीच्या गेटवर त्याची गाडी आदळली. त्यावरून विनोदचा वॉचमन आणि तेथील रहिवाशांसोबत वाद झाला. हा किरकोळ वाद इतक्या टोकाला गेला, की इमारतीमधील रहिवाशांनी त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध वेगाने गाडी चालवणे, लोकांचा जीव धोक्यात घालणे, त्याच बरोबर इमारतीच्या संपत्तीला धोका पोहोचवणे, आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनोदची गाडी इमारतीच्या गेटला आदळली, तेव्हा त्याने मद्यपान केले होते, असे पोलिसांनी म्हटले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

बाब्बो.. रशियाची इतकी दशलक्ष डॉलर मालमत्ता गोठवली.. अमेरिका, युरोपियन युनियनने घेतला मोठा निर्णय
IND vs SL: श्रेयस अय्यरने रवींद्र जडेजाबद्दल दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…

Advertisement
Advertisement

Leave a Reply