Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘बिग बाजार’ कुलुपबंद.. ‘रिलायन्स’ची मोठी खेळी, नेमकं काय झालंय, वाचा..!

मुंबई : देशातली सर्वात मोठा रिटेलर ग्रुप म्हणजे, फ्युचर रिटेल लिमिटेड.. या ग्रुपची ‘बिग बाजार’ स्टोअर्सचे जाळे संबंध देशभर पसरलेले आहे.. त्यातही रविवार म्हटलं, की ‘बिग बाजार’सहीत अनेक शॉपिंग मॉलमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी असते. मात्र, काल (रविवारी) देशभरातली ‘बिग बाजार’ स्टोअर्स बंद होती. कंपनीच्या वेबसाईटवरही कोणतीही ऑर्डर प्लेस होत नव्हती. साईट ओपन करताच ‘वेबसाईट’ अपग्रेड होते आहे, असा मेसेज ग्राहकांना येत होता. शनिवारीही ‘बिग बाजार’ टाळेबंद असल्याने ग्राहकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.. ‘बिग बाजार’ने आपली बहुतांश ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर्स बंद केली होती. त्याचे महत्वाचे कारण आता समोर आले आहे…

Advertisement

एका अहवालानुसार उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने ‘फ्युचर ग्रुप’ टेक ओव्हर केला आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून हे स्टोअर्स बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘फ्युचर ग्रुप’ स्टोअर्सचे ‘लीज रेंट’ देऊ शकत नसल्याने किशोर बियानी यांच्या फ्युचर ग्रुपच्या स्टोअर्सची ‘रिलायन्स’कडून आता ‘रिब्रँडिंग’ केली जाणार आहे. देशातले जे स्टोअर्स ‘लीज’वर होते, त्या सगळ्यांच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकंच नाही, तर रिलायन्सने फ्युचर ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना नोकरीचीही ऑफर दिल्याचे समजते..

Loading...
Advertisement

अर्थात, ‘फ्युचर ग्रुप’ किंवा ‘रिलायन्स’ इंडस्ट्रीजकडून यासंदर्भात काहीही भाष्य करण्यात आलेलं नाही.. स्टॉक एक्स्चेंजला फ्युचर ग्रुपतर्फे सांगण्यात आलं की आम्ही आमचं काम करत आहोत. दरम्यान, ‘रिलायन्स’ने रिब्रँडिंगपूर्वी स्टॉक-टेकिंग केल्यामुळे संपूर्ण भारतभर फ्यूचरचे स्टोअर्स बंद राहिल्याचे या योजनांशी परिचित असलेल्या जाणकारांनी सांगितले. “आम्हाला तुम्हाला कळवण्यास खेद होत आहे की सध्या स्टोअर्स 2 दिवसांसाठी बंद आहेत..” बिग बाजारने एका ट्विटर वापरकर्त्याला सांगितले, ज्याने ते बंद झाल्याची तक्रार केली होती.

Advertisement

बाब्बो.. रशियाची इतकी दशलक्ष डॉलर मालमत्ता गोठवली.. अमेरिका, युरोपियन युनियनने घेतला मोठा निर्णय
‘या’ प्लानचाही विचार करा..! मिळतोय 2000 GB डेटा आणि इतका डिस्काउंट.. चेक करा, डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply