Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

एसटी संपाचा तिढा कायम, हायकोर्टात आज काय घडलं, वाचा..!

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी 28 ऑक्टोबर 2021 पासून कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्य सरकारने वेतनवाढीसह इतर काही मागण्या मान्य केल्यानंतर बहुतांश कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली. परंतु, त्यानंतरही काही कर्मचारी एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. एसटी विलीनीकरणाच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी कोर्टाच्या आदेशाने राज्य सरकारने समिती स्थापन केली. या समितीमार्फत राज्य सरकारकडे अहवाल सादर करण्यात आला.

Advertisement

दरम्यान, समितीने सादर केलेला अहवाल आज राज्य सरकारकडून न्यायालयात सादर केला जाणार होता. मात्र, एसटी विलीनीकरणाचा अहवाल सार्वजनिकरित्या जाहीर करता येणार नसल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली. एसटी महामंडळाच्या वकिलांनी राज्य सरकारकडून विलीनीकरणाबाबतचा अहवाल मागितला होता. त्यावर राज्य सरकारच्या वकिलांनी हायकोर्टात हे उत्तर दिले. त्यामुळे एसटी विलीनीकरणाच्या अहवालावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार आता 11 मार्चला यावर सुनावणी होणार आहे.

Advertisement

कोर्टाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा  कायम राहिला. एसटी विलिनीकरणाच्या अहवालाला राज्य मंत्रिमंडळाची परवानगी आवश्यक असल्याचं मत राज्य सरकारतर्फे मांडण्यात आलं. त्यामुळे हायकोर्टाने 11 मार्चला त्यावर सुनावणी ठेवली असून, कोर्टाच्या निर्णयाकडे एसटी कर्मचाऱ्यांसह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून राज्याची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटीचे चाक रुतले आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशी, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या संपामुळे एसटी महामंडळाचे तब्बल 1600 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर हजर व्हावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे..

Advertisement

Corona Update : कोरोनाबाबत नवीन अपडेट.. पहा, देशात कोरोना रुग्ण वाढले की घटले..?
आधी मदत मागितली आता म्हणतोय आम्ही निराश..! पहा, भारताबाबत युक्रेनने काय म्हटलेय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply