Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘I Love You…’ म्हटल्याने मुलीचा विनयभंग होतो का..? ‘पोक्सो’ न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल…!..

मुंबई : गेल्या काही वर्षांत महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी, तसेच आरोपींवर वचक बसावा, यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले आहेत. त्याद्वारे आरोपीला मोठी शिक्षा दिली जाते.. गेल्या काही दिवसांत विनयभंगाच्या तक्रारी जास्त प्रमाणात होताना दिसत आहेत. पार्श्वभूमीवर पोक्सो विशेष न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मुलीला एकदा ‘आय लव्ह यू’ म्हटल्यास हा तिचा हेतुपरस्सर विनयभंग होतो का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल, त्याचे उत्तर पोक्सो विशेष न्यायालयाने (POCSO special court) दिले आहे.. त्याआधी हे नेमंक हे प्रकरण काय होतं, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकं प्रकरण काय..?
2016 साली आरोपी तरुणाने एका 17 वर्षीय मुलीला ‘आय लव्ह यू’ असं म्हटलं होतं. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह तरुणाविरुद्ध विनयभंगाचाही गुन्हा दाखल केला. आरोपी पीडित मुलीकडे एकटक पाहत होता. तसेच त्याने पीडितेकडे पाहून डोळे मिचकावले होते. शिवाय त्याने पीडितेच्या आईला धमकीही दिली होती, असे विविध आरोप संबंधित तरुणावर करण्यात आले होते.

Loading...
Advertisement

पोक्सो विशेष न्यायालयासमोर हे प्रकरण आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला, पण डोळे मिचकावल्याचे अथवा धमकी दिल्याबाबत कोणतेही सबळ पुरावे फिर्यादी पक्षाला सादर करता आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आरोपी तरुणाची निर्दोष सुटका केली. आपला निर्णय देताना न्यायालयाने असं म्हटलं, की आरोपी तरुणाने एकदाच पीडित मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटलं होतं. त्यानं ही गोष्ट वारंवार केलेली नाही. त्यामुळे हा विनयभंग ठरू शकत नाही. संबंधित तरुणाचं मुलीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यानं हे उद्गार काढल्याचं स्पष्ट होतं. ‘आय लव्ह यू’ म्हटल्याने विनयभंग होत नाही, तर मुलीवरील प्रेम व्यक्त करण्याची ती भावना असते, असं न्यायालयाने स्पष्ट केले व 23 वर्षीय संशयित आरोपी तरुणाची निर्दोष सुटका केली आहे.

Advertisement

बाब्बो.. म्हणून तेलाच्या बाजारात उडालाय हाहाकार.. पहा, ‘त्या’ संकटाने कच्चे तेल कुठे पोहोचले..?
आता युरोपीय देश आक्रमक..! रशियाच्या विरोधात तयार होतोय ‘हा’ खतरनाक प्लान; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply