Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अखेर आयपीएलची तारीख जाहीर, या तारखेपासून रंगणार क्रिकेटचा थरार…

मुंबई : क्रिकेट रसिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.. यंदाची ‘आयपीएल’ कधीपासून सुरु होणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अखेर ‘आयपीएल’ (IPL 2022)चं बिगूल वाजलंय. त्यानुसार, यंदा 26 मार्चपासून ‘आयपीएल’ला सुरुवात होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउंन्सिलची बैठक झाली. त्यात यंदाच्या हंगामास 26 मार्चपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी जगासह भारतात कोरोनाचे संकट मोठे असल्याने आयपीएलचे सामने युएईमध्ये खेळविण्यात आले होते. मात्र, यंदा सर्व सामने भारतातच, कोरोनाबाबत आवश्यक ती काळजी घेऊन खेळवले जाणार आहेत. बहुतांश सामने हे पुणे आणि मुंबईतच खेळवले जाणार आहेत.

Advertisement

मुंबईत 55, तर पुण्यात 15 मॅच होणार असल्याचे सांगण्यात आले. पैकी 20 सामने हे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, 20 सामने डी.वाय. पाटील स्टेडियमवर, तर सीसीआयमध्ये 15 सामने होणार आहेत. तसेच पुण्यात 15 सामने होणार असल्याची माहिती आयपीएल गव्हर्निंग काउंन्सिलतर्फे देण्यात आली. यंदा अहमदाबाद व लखनऊ असे दोन नवीन संघ पहिल्यांदाच ‘आयपीएल’च्या मैदानात उतरणार आहेत.. त्यामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढणार आहे..

Advertisement

कोरोना संसर्ग कमी झाल्याने यंदा प्रेक्षकांना मैदानात जाऊन मॅच पाहता येणार असल्याचे समजते.. अर्थात त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.

Loading...
Advertisement

आयपीएलमध्ये सहभागी संघ
1. दिल्ली कॅपिटल्स

2. चेन्नई सुपर किंग्ज
3. मुंबई इंडियन्स
4. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
5. कोलकाता नाईट रायडर्स
6. पंजाब किंग्ज
7. गुजरात टायटन्स
8. लखनऊ सुपर जायंट्स
9. सनरायझर्स हैदराबाद
10. राजस्थान रॉयल्स

Advertisement

बाब्बो.. म्हणून तेलाच्या बाजारात उडालाय हाहाकार.. पहा, ‘त्या’ संकटाने कच्चे तेल कुठे पोहोचले..?
Russia-Ukraine War : आम्ही युद्धात एकटे पडलो.. रशियाला माफ करणार नाही.. कोणी दिलाय इशारा

Advertisement
Advertisement

Leave a Reply