Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युद्धासोबतच फ्लर्टिंग.. रशियन सैनिकांकडून युक्रेनच्या महिलांना ‘फ्लर्टी मेसेज’..

दिल्ली : रशिया व युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांच्या वादानंतर अखेर आज युद्धाला तोंड फुटले. युक्रेनची राजधानी किव्ह आणि खारकिव्ह या शहरांवर रशियन सैनिकांनी जोरदार बॉम्ब हल्ले केले. स्फोटांच्या आवाजाने युक्रेन हादरले आहे.. दरम्यान, एकीकडे दोन्ही देशांमध्ये जोरदार युद्ध पेटलेले असताना, एक वेगळीच बातमी आली आहे.. ते म्हणजे, रशियन सैनिक युद्धासोबतच युक्रेनियन महिलांसोबत ‘फ्लर्ट’ करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन सैनिक ‘टिंडर’वर ‘फ्लर्टी मेसेज’ पाठवत असल्याचा दावा एका युक्रेनियन महिलेने केला आहे.

Advertisement

युक्रेनमधील या महिलेने थेट स्क्रिन शॉटच शेअर केला आहे. त्यात ती पुढे म्हणते, की रशियन सैनिक युक्रेनच्या महिलांना सोशल मीडियावर फ्लर्टच्या उद्देशाने मेसेज पाठवत आहेत. अनेक सैनिकांनी कथितपणे आपल्या पदांची माहितीही फोटोंसोबत पाठवली आहे. अनेक रशियन सैनिकांकडून युक्रेनियन महिलांना आकर्षित करण्यासाठी आपल्या प्रोफाईल डेटिंग अॅपवर अकाऊंट तयार केले आहे.

Loading...
Advertisement

युक्रेनमधील दाशा सिनेल्निकोवा नावाच्या महिलेने सांगितले, की टिंडरवर अनेक रशियन सैनिक तिला मेसेज पाठवत आहेत. मी युक्रेनमधील किव्ह येथे राहते. एका मित्राने सांगितले, की, टिंडरवर अनेक रशियन सैनिक आले आहेत. त्यामुळे मी माझं लोकेशन खार किव्ह असं बदललं. मात्र, तेथेही मला सैनिकांकडून मेसेज येऊ लागले. एका फोटोमध्ये एक रशियन सैनिक बनियानमध्ये दिसत होता, तर एका फोटोमध्ये एक सैनिक पिस्तुलासह बेडवर झोपलेला दिसत होता. मात्र, मी टिंडरवर त्यांची रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याचे त्यांनी सांगितले..

Advertisement

.. म्हणून ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी केलेय धरणे आंदोलन; विरोधी भाजपही आक्रमक.. पहा, काय सुरू आहे राजकारण..?
युक्रेन-रशिया वादाचा जबर फटका, सेन्सेक्स-निफ्टीत विक्रमी घसरण, झटक्यात 10 लाख कोटींचे नुकसान..

Advertisement
Advertisement

Leave a Reply