Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युक्रेन-रशिया वादाचा जबर फटका, सेन्सेक्स-निफ्टीत विक्रमी घसरण, झटक्यात 10 लाख कोटींचे नुकसान..

मुंबई : रशिया व युक्रेनमध्ये सुरु झालेल्या युद्धाचा थेट परिणाम भारतील शेअर बाजारावर पाहायला मिळाला.. भारतीय शेअर बाजारात आज विक्रमी घसरण पाहायला मिळाली.. गेल्या काही दिवसांपासून भांडवली बाजारात सातत्याने पडझड सुरु होती. त्यावर आज कळस चढला.. बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) 2702.15 अंकांनी किंवा 4.72 टक्क्यांच्या घसरणीसह 54529.91 अंकांवर बंद झाला, तर दुसरीकडे निफ्टी (Nifty) 815.30 अंकांच्या किंवा 4.78 अंकांच्या घसरणीसह 16248 अंकांवर बंद झाला.

Advertisement

मागील सलग सात ट्रेडिंग सेशनमध्ये घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे एका झटक्यात तब्बल 10 लाख कोटी रुपयांचे नुकसानं झालंय. निफ्टीचे सर्वच्या सर्व 50 शेअर्स हे ‘रेड झोन’मध्ये गेले, तर सेन्सेक्सच्याही 30 शेअर्सला मोठा फटका बसला. शेअर बाजारातील सर्व इंडेक्स आज लाल निशाणात बंद झाले.

Advertisement

बँकिंग, आयटीमध्ये मोठी घसरण
सर्वांत मोठी घसरण बँकिंग आणि आयटी समभागांना कारणीभूत ठरली. इंडस इंड बँकेचा शेअर जवळपास सात टक्क्यांनी घसरला. नंतर एशियन पेंट, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फायनान्स, एचसीएल, बजाज फिनसर्व्ह, मारुती यांच्या समभागातही चार टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बाजारात विक्रीचे वातावरण असून, बीएसई निर्देशांकातही सर्वांत कमी दोन टक्क्यांची घसरण झाली.. निफ्टी बँकमध्ये 5.79 टक्क्यांची, निफ्टी आयटीमध्ये 4.59 टक्क्यांची, स्मॉलकॅपमध्ये 5.77 टक्क्यांची घसरण झाली..

Loading...
Advertisement

युक्रेनमधील रशियन लष्करी कारवाईनंतर ब्रेंट क्रूडने 7 वर्षात प्रथमच 100 डॉलरचा टप्पा ओलांडल्याने मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. आजच्या घसरणीत गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींहून अधिकचं नुकसान झालं. आज दिसून आलेली अस्थिरता एकत्रितपणे गुंतवणुकदार आणि व्यापारी दोघांसाठीही वेदनादायक होती.

Advertisement

स्वदेशी कंपनीच्या दुचाकींची विदेशात क्रेझ..! पहा, कोणत्या कंपनीने केलेय ‘हे’ जबरदस्त रेकॉर्ड
.. म्हणून ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी केलेय धरणे आंदोलन; विरोधी भाजपही आक्रमक.. पहा, काय सुरू आहे राजकारण..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply