Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..! ‘या’ रेल्वेमध्ये सुरू होणार ‘हा’ खास उपक्रम; वाचा महत्वाची माहिती

दिल्ली : देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे देशात रेल्वेचे मोठे महत्व आहे. रेल्वे प्रवास आधिक आरामदायक व्हावा यासाठी रेल्व विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. आता भारतीय रेल्वेने (Indian Railway) आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

Advertisement

वास्तविक, प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी रेल्वेने एक खास योजना सुरू केली आहे. ‘न्यू इंडिया’ च्या कल्पनेने उत्तर रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये एक मोठा मनोरंजन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. आता प्रवाशांना दिल्ली, भोपाळ, चंदीगड, लखनऊ, डेहराडून, कानपूर, कटरा, वाराणसी आणि काठगोदाम येथे प्रवास करताना शताब्दी आणि वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पारंपरिक रेडिओ संगीत ऐकण्याचा लाभ मिळणार आहे.

Advertisement

ही नवीन सुरुवात उत्तर रेल्वेने केली आहे, ज्या अंतर्गत दिल्ली विभागातील सर्व शताब्दी आणि वंदे भारत रेल्वेंमध्ये रेडिओ सेवा पुरवण्यासाठी करार करण्यात आला आहे. बहुतेक लोकांना प्रवासात संगीत ऐकायला आवडते. उत्तर रेल्वे प्रवासी उद्घोषणा प्रणालीद्वारे मनोरंजनाची नवीन पद्धती सादर करणार आहे. सध्या 10 शताब्दी आणि 2 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेंमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशात रेल्वेने प्रवास करणे आता अधिक सुरक्षित होणार आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व मध्य रेल्वे (ECR) विभाग लवकरच ‘कवच’ नावाची प्रणाली सुरू करणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रेल्वे सुरळीत चालण्यास मदत होणार आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत, 2022-23 मध्ये सुरक्षेसाठी स्वदेशी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान कवच (कवच तंत्रज्ञान) अंतर्गत 2,000 किमीचे नेटवर्क आणले जाईल. रेल्वेचे जाळे सुरक्षित करण्याबरोबरच त्याच्या क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीनेही या तंत्रज्ञानाच उपयोग होणार आहे.

Advertisement

ईसीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, ही प्रणाली पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन धनबाद मार्गावर स्थापित केली जाईल आणि त्यासाठी अंदाजे 151 कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 408 किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग देशातील 77 रेल्वे स्टेशन आणि 79 लेव्हल क्रासिंग गेट समाविष्ट करणारा एक महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावर ताशी 130 किमी वेगाने रेल्वे चालवण्यास विभागाने परवानगी दिली आहे.

Advertisement

रेल्वेचे क्रेडिट कार्ड लाॅंच..! प्रवाशांना स्वस्त तिकिटासह मिळणार हेही फायदे…!

Advertisement
Advertisement

Leave a Reply