Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशिया-युक्रेन युद्धाचा सोने दरावर मोठा परिणाम, गुंतवणुकदारांकडून मागणी वाढली..

नवी दिल्ली : रशिया-युक्रेनमध्ये युद्धाची ठिणगी पडल्याने जागतिक शेअर बाजारावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शेअर बाजार कोसळले असून, गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. रशिया व युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे सोने दरावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण असल्याने गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळल्याचे दिसत आहे. परिणामी, सोन्याची मागणी वाढल्याने त्याचा दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.

Advertisement

भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी (Gold-Silver Price Today) वाढ झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज एप्रिल डिलीवरी सोने दरात 1.42 टक्क्यांची मोठी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅममागे 51,000  रुपयांवर पोहोचल्याचे दिसत आहे.. दरम्यान, चांदीच्या दरातही आज तेजी आहे. चांदीचा भाव (Silver Price Today) आहे 1.40 टक्क्यांच्या तेजीसह ट्रेड करीत आहे.

Advertisement

आजचे सोने-चांदी दर
एप्रिल डिलीवरी गोल्डचा दर आज 1.42 टक्क्यांच्या मोठ्या तेजीसह 51,095 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. चांदीच्या दरात 1.40 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह चांदीचा भाव 65,490 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, बुधवारी (ता. 23) सोन्याच्या दरात 82 रुपयांची घट होऊन 50,049 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. याआधी मंगळवारी सोने 50,131 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होतं. त्याचबरोबर चांदीचा भाव 169 रुपयांनी घसरून 64,203 रुपये प्रति किलोवर बंद झाला., तर मंगळवारी चांदी 64,372 प्रति किलोच्या पातळीवर बंद झाली होती. आगामी काळात सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे..

Advertisement

रशिया-युक्रेनमध्ये युद्धाची ठिणगी.. भारतीय शेअर बाजारावर झाला असा परिणाम..
रशिया-युक्रेनमध्ये युद्धाची ठिणगी.. भारतीय शेअर बाजारावर झाला असा परिणाम..

Advertisement
Advertisement

Leave a Reply