मुंबई : रशिया व युक्रेनमध्ये आज युद्धाची ठिणगी पडली असल्याने जगभरात चिंता व्यक्त होतेय. या दोन्ही देशांतील संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार असून, त्याची झलकच आज पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. अमेरिकन शेअर बाजार बुधवारी (ता. 23) मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. भारतीय शेअर बाजारातही आज सेन्सेक्स (Sensex) पडझडीसह उघडला, तर निफ्टीमध्येही (Nifty) घसरण दिसून आली. सेन्सेक्स तब्बल 1813 अंकांनी कोसळला.
सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 1457 अंकांची घसरण झाली. निफ्टीतही 404 अंकांची घसण होऊन तो 16 हजार 659 अंकांवर आला होता.. रशिया व युक्रेनमधील संघर्षामुळे शेअर बाजारातील ही घसरण पाहायला मिळत आहे. आज बँक निफ्टी, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फायनान्शिअल सर्विसेस, एफएमसीजी, आयटी इंडेक्स, मेटल, मीडिया, फार्मा, पीएसयू बँकसह सर्व इंडेक्समध्ये घसरण झाल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, बुधवारीही (ता. 23) देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली होती. गेल्या सलग सहाव्या दिवशीही शेअर बाजारात ही घसरण सुरू राहिली. बीएसई सेन्सेक्स 68.62 अंकांनी घसरला. युक्रेनच्या संकटामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. 30 शेअर्सचा सेन्सेक्स 68.62 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 57,232.06 वर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (निफ्टी 50) 28.95 अंकांनी अर्थात 0.12 टक्क्यांनी घसरून 17,063.25 वर आला.
आगामी काळात या दोन देशांमधील वादाचे तिव्र पडसाद जागतिक घडामोडींवर पाहायला मिळू शकतात. त्यातून इंधनाचे दर गगणाला भिडण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
बाब्बो.. म्हणून तेलाच्या बाजारात उडालाय हाहाकार.. पहा, ‘त्या’ संकटाने कच्चे तेल कुठे पोहोचले..?
खरेदी करताय..? ; मग, ‘या’ नेहमीच्या सवयी टाळाच; बजेट होईल सोपे, वाचतील पैसे