Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘मारुती सुझुकी’ला ‘अच्छे दिन’.. या संकटातही केलाय जोरदार कारनामा..!

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतात वाहनांसाठी लागणाऱ्या सेमीकंडक्टरचा (Semiconductor) तुटवडा जाणवत होता. सेमीकंडक्टर अभावी वाहन उत्पादनाला काही प्रमाणात ब्रेक लागला होता. मात्र, येणाऱ्या काळात सेमीकंडक्टरचा हा तुटवडा दूर होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पुन्हा एकदा वाहनांचे उत्पादन पूर्ववत होऊ शकते.

Advertisement

एकीकडे वाहन निर्मितीत अडचणी येत असताना, ‘मारुती सुझुकी’साठी ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे.. देशात ‘मारुती’च्या वाहनांची मागणी वाढल्याची माहिती ‘एमएसआई’चे निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चेनिची आयुकावा यांनी म्हटले आहे. सेमीकंडक्टरचा तुटवडा दूर झाल्यास वाहन विक्रीला 2018-19 च्या स्तरावर पोहोचविण्याचे उद्दष्ट असल्याचेही ते म्हणाले. 2018-19 या वर्षात कंपनीच्या 18.62 लाख वाहनांची विक्री झाली होती. तर 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीच्या केवळ 13.18 वाहनांचीच विक्री झालीय.

Advertisement

आयुकावा म्हणाले, की कोरोनामुळे देशात सेमीकंडक्टरच्या चीपचे उत्पादन कमी झाले. सेमीकंडक्टरचा नियमित पुरवठा होत नसल्याने, त्याचा परिणाम वाहन निर्मितीवर झाला. वाहन निर्मिती कमी होत असल्याने, विक्रीचे आकडेही खाली आले आहेत. मात्र, भविष्यात हे चित्र सुधारेल अशी अपेक्षा आहे. सेमीकंडक्टरची समस्या दूर झाल्यास, आम्ही वाहन विक्रीमध्ये 2018-19 चा स्तर गाठू. केंद्र सरकारचे कौतुक करताना सरकारने चांगले बजेट सादर केले असून, भविष्यात व्यवसाय वाढीसाठी त्याचा होऊ शकतो, असे ते म्हणाले.

Loading...
Advertisement

वाहन निर्मितीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यातच सेमीकंडक्टरचा तुटवडा असल्याने वाहन निर्मिती कमी होत आहे. त्या तुलनेत कारची मागणी वाढल्याने भविष्यात वाहनांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही वाहन कंपन्यांनी या आधीच आपल्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. देशावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकट आहे. त्याचा देखील मोठा फटका हा वाहन उद्योगाला बसला आहे.

Advertisement

Health tips : कोरड्या खोकल्याने असाल हैराण.. तर हे घ्या चार घरगुती रामबाण उपाय
चीनचा आणखीही एक भारतविरोधी कुरापतनामा..! पहा श्रीलंकेत नेमका काय खेळ चालू केलाय

Advertisement
Advertisement

Leave a Reply