Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशियाकडून युद्धाबाबत सर्वात मोठी घोषणा, जगावर होणार भयानक परिणाम..

नवी दिल्ली : रशियातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया व युक्रेनमधील वाद विकोपाला गेल्याने मोठ्या युद्धाचे सावट पसरले होते. त्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध थेट युद्धाचीच घोषणा केली आहे. युक्रेननं सहकार्य केल्यास ‘नाटो’ला गंभीर परिणाम भोगावे लागतील, युक्रेनच्या सैन्यानं शस्त्र खाली ठेवून माघार घ्यावी, अशी थेट धमकीच पुतिन यांनी दिली आहे. मात्र, त्याच वेळी युक्रेनवर कब्जा मिळवण्याचा आपला कोणताही इरादा नसल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलं आहे. रशियाच्या भूमिकेमुळे जगावर तिसऱ्या युद्धाचे ढग अधिक दाटले आहेत..

Advertisement

पुतिन यांनी युद्ध जाहीर केल्यानंतर लगेचच युक्रेन आणि राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट झाल्याची माहिती मिळाली. वृत्तानुसार, क्रमाटोस्कमध्ये 2 स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत. रशियन सैनिक क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये प्रवेश करीत आहेत. दोन लाखांहून अधिक रशियन सैनिक सीमेवर तैनात आहेत. पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक भागात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राने (UN) पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

रशिया व युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दोन्ही देशांना परस्परांशी चर्चा करुन तोडगा काढावा, असे आवाहन युरोपसह पाश्चात्य देशांनी केले होते. रशियाने युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र देशाची मान्यता दिली. त्यानंतर अमेरिका आणि युरोपसह इतर देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. तरीही रशियाने माघार न घेता, युद्धाची घोषणा केली आहे.

Loading...
Advertisement

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी औपचारिकपणे युद्धाची घोषणा केली. युद्धाला सुरुवात झाल्यास संपूर्ण जग ठप्प होईल. संयुक्त राष्ट्राने पुतीन यांना युद्ध थांबवण्यास सांगितले आहे. त्याच वेळी रशियावर कब्जा करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे पुतीन यांचे म्हणणे आहे.

Advertisement

Russia-Ukraine War News: युक्रेनने घेतलाच ‘तो’ महत्वाचा निर्णय; युद्धासाठी जग झाले सज्ज..!
Ukraine crisis : युक्रेनमध्ये एक महिना आणीबाणी; रशियाचा धोका रोखण्यासाठी होतोय असा प्लान..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply