Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नबाव मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, मलिकांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं..?

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांच्या अटकमुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली असून, तिन्ही पक्षांचे नेते एकवटले आहेत.. महाविकास आघाडीने आता ईडीच्या कारवाईविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महाविकास आघाडीतील सर्व मंत्री, नेते उद्या (गुरुवारी) आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली..

Advertisement

मुंबईतील मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीतील नेते, मंत्री उद्या (गुरुवारी) सकाळी 10 वाजता या कारवाईचा निषेध करणार आहेत. तिन्ही पक्षांचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते मंत्रालयाच्या बाजूलाच असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेधासाठी जमतील.. ईडीच्या या कारवाईविरोधात महाविकास आघाडी म्हणून सत्ताधारी एकत्र येणार आहे. नवाब मलिक यांच्या कारवाई विरोधात महाविकास आघाडीने निषेधाचा पवित्रा घेतला आहे.

Loading...
Advertisement

मलिक यांचा राजीनामा घेणार का..?
मलिक यांच्या अटकेनंतर ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.. सगळी सूत्रे आपल्या हाती घेत पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक घेतली. शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी ही बैठक पार पडली. त्याला राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते हजर होते. तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हेसुद्धा हजर होते. या बैठकीमध्ये नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपने ज्या प्रकारे सरकारी तपास यंत्रणाचा वापर केला आहे. त्याला चोख उत्तर देण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहे. त्यानंतर पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झाले. मात्र, आता भाजपविरोधातील संघर्ष आणखी पेटणार असल्याचे संकेत मिळत आहेत..

Advertisement

बाब्बो.. म्हणून तेलाच्या बाजारात उडालाय हाहाकार.. पहा, ‘त्या’ संकटाने कच्चे तेल कुठे पोहोचले..?
ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी सुरु, डाॅन दाऊदशी संबंधित ‘या’ प्रकरणामुळे कारवाई..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply