Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय, याचिकाकर्त्याची खरडपट्टी..!

मुंबई :  दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. कोरोनाचे संकट कमी झाल्याने राज्य सरकारने यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयावरुन राज्यात मोठे वादंग निर्माण झाले. अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवण्यात आला, तर आता बोर्डाच्या परीक्षाही ऑनलाईनच घ्याव्यात, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मात्र, त्यानंतरही निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांनी थेट सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तेथेही विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. सुप्रीम कोर्टाने विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावताना, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगितलेय. त्याच वेळी अशी याचिका दाखल केल्याबद्दल याचिकाकर्त्यांना कडक शब्दात सुनावलं…

Advertisement

सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE), तसेच स्टेट बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन न घेता, गेल्या वर्षीप्रमाणे मूल्यमापनाच्या पद्धतीचा वापर करावा आणि निकाल त्या पद्धतीनं जाहीर करावा, तसे आदेश कोर्टानं शिक्षण मंडळांना द्यावेत, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. वकील आणि बाल हक्क कार्यकर्ते अनुभा सहाय श्रीवास्तव यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

Advertisement

सुप्रीम कोर्ट काय म्हणाले..?
न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, कोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलंच सुनावलं. “परीक्षांबाबत योग्य तो निर्णय फक्त प्रशासनाला घेऊ द्या. अशा याचिका फक्त विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्यासाठी असतात. मुळात या याचिकेला प्रसिद्धी दिली कोणी..? त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होते. त्यानंतर अशा प्रकारच्या याचिका दाखल करू नका…” अशा शब्दांमध्ये सुप्रिम कोर्टाने याचिकाकर्त्यांची खरडपट्टी काढली..

Loading...
Advertisement

दरम्यान, सर्वाेच्च न्यायालयानेच आता ऑफलाईन परीक्षा योग्य असल्याचा निर्वाळा दिल्याने विद्यार्थ्यांसमोर कोणताही पर्याय राहिलेला नाही.. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता जोरदार अभ्यासाला लागावे लागणार आहे.. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला असला, तरी काही विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागत केले आहे..

Advertisement

रोहीत बनणार राजा; बाबर आझमचा ‘तो’ विक्रम मोडणार
बाब्बो.. म्हणून तेलाच्या बाजारात उडालाय हाहाकार.. पहा, ‘त्या’ संकटाने कच्चे तेल कुठे पोहोचले..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply