Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने दिलीय जोरदार प्रतिक्रिया.. पहा, काय म्हणालेत मंत्री जयंत पाटील

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केल्याने राज्यात राजकीय वादळ उठले आहेत. या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे या मुद्द्यावर राजकीय विश्वातूनही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पाटील यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाटील म्हणाले, की मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे आणि त्याचा हा एक प्रकार आहे. कुठलीही नोटीस न देता, त्यांना सूचना न देता सकाळी सहा वाजता ईडीचे अधिकारी येऊन राज्यातील एका मंत्र्याला कोणतीही माहिती न देता घेऊन जाणे. हे सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. अलीकडच्या काळात नवाब मलिक यांनी काही प्रकरण बाहेर काढली आहेत त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित जाणीवपूर्वक नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचं काम काहीजण करत आहेत. नवाब मलिकांवर राग काढण्याचे काम कदाचित सुरू झालेले दिसत आहे.

Advertisement

आज सकाळी 5 वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर सकाळी सात वाजता मलिक स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर राहिले. त्यानंतर त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, या मुद्द्यावर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सरकारमधील मंत्री भाजपवर जोरदार टीका करत आहे, तर दुसरीकडे भाजप नेते सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत.

Advertisement

ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी सुरु, डाॅन दाऊदशी संबंधित ‘या’ प्रकरणामुळे कारवाई..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply