Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रेल्वेचे क्रेडिट कार्ड लाॅंच..! प्रवाशांना स्वस्त तिकिटासह मिळणार हेही फायदे…!

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेच्या केटरिंग आणि तिकीट युनिट (IRCTC)ने आपल्या यूजर्ससाठी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड (Co-Branded Credit Card) लॉन्च केले आहे. हे क्रेडिट कार्ड ‘एनपीसीआय’ (NPCI) व बॅंक ऑफ बडोदा (BOB) फायन्शियल सोल्यूशंससह एकत्रितपणे लॉन्च केले आहे. या कार्डमुळे प्रवाशांना अनेक सुविधा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

‘आयआरसीटीसी’च्या वेबसाइटवर रोज 6 कोटीहून अधिक यूजर्स रेल्वेचे तिकिट बूक करतात.  कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्डमुळे रेल्वेने नियमित प्रवास करणाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रवाशांसाठीच हे कार्ड तयार केले आहे. BOB फायनांशियल सोल्यूशन्स लिमिटेड (BFSL) ही बँक ऑफ बडोदा (BOB) च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. या क्रेडिट कार्डपासून ग्राहकांना कोणते फायदे होणार याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Loading...
Advertisement

ग्राहकांना काय फायदे होणार..?

Advertisement
  • सर्वात महत्वाचे म्हणजे, या क्रेडिट कार्डचा वापर इंधन, किराणा मालासह इतर गोष्टींच्या खरेदीसाठीही करू शकतात.
  • जेसीबी (JCB) नेटवर्कच्या माध्यमाने इंटरनॅशनल मर्चंट्स व एटीएममध्ये देवाण-घेवाण करण्यासाठीही होऊ शकतो.
  • क्रेडिट कार्डच्या मदतीने आयआरसीटीसी (IRCTC) वेबसाइट अथवा मोबाइल अॅपच्या माध्यमाने 1AC, 2AC, 3AC, CC, किंवा EC बुकिंग करणाऱ्या यूजर्सना 40 रिवॉर्ड पॉइंट मिळणार आहेत.
  • शिवाय हे कार्ड सर्व प्रकारच्या ट्रेन तिकिट बुकिंगवर 1 टक्के ट्रांन्झेक्शन शुल्क सूटही ऑफर करते.
  • कार्ड जारी झाल्यानंतर 45 दिवसांत 1,000 रुपये अथवा त्याहून अधिकची सिंगल खरेदी करणाऱ्यांना 1,000 बोनस रिवॉर्ड पॉइंट्सदेखील मिळतील.
  • कार्डचा वापर करुन किराणा आणि डिपार्टमेंटल स्टोअर्सवर चार रिवॉर्ड पॉइंट (per Rs 100 spent) आणि इतर कॅटेगिरीवर दोन रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.
  • कार्डधारकांना दरवर्षी चार वेळा रेल्वे लाउंजची मोफत व्हिजिटही करता येईल.
  • शिवाय, याद्वारे ग्राहकांना भारतातील सर्व पेट्रोल पंपांवर एक टक्का ईंधन सरचार्जमधून सूटही मिळणार असल्याचे सांगण्यात आले..

Gold Price : आज सलग दुसऱ्या दिवशी सोने चमकले; सोने भाववाढीत ‘त्या’ संकटाने अशी केलीय मदत; जाणून घ्या.. नवे दर..
बाब्बो.. म्हणून तेलाच्या बाजारात उडालाय हाहाकार.. पहा, ‘त्या’ संकटाने कच्चे तेल कुठे पोहोचले..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply