Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी सुरु, डाॅन दाऊदशी संबंधित ‘या’ प्रकरणामुळे कारवाई..!

मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंत्री नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊन गेल्याचे वृत्त आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते.

Advertisement

‘ईडी’ अधिकाऱ्यांचे एक पथक आज सकाळी पाच वाजताच नवाब मलिक यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर जवळपास दोन तास चर्चा सुरू होती. नंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक यांनी स्वत: हून ईडी कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचे सांगितले. नंतर ते ईडी अधिकाऱ्यांसोबत कार्यालयात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Advertisement

नेमकं प्रकरण काय?
ईडीनं काही दिवसांपूर्वी मुंबईत व लगतच्या परिसरात छापेमारी केली होती. त्यात डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता व त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर आली होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात, याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. त्यानंतर आता मलिक यांच्या घरी ईडीचे पथक आल्याने ही चर्चा खरी होताना दिसत आहे.

Loading...
Advertisement

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना समन्स बजावले होते. त्यानुसार आज ईडीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. मात्र, या कारवाईमुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमधील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

Advertisement

काम की बात : ईडी म्हणजे काय.. कसे चालते काम.. घ्या जाणून सविस्तर
‘त्या’ प्रश्नावर चीनने उत्तर देणे टाळले..! अमेरिकेच्या विरोधात चीन रशियाला करतोय मदत..

Advertisement
Advertisement

Leave a Reply