Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कमाईची संधी, आता ‘स्विगी’चाही IPO येणार.. गुंतवणुकदारांची चांदी होणार..!

मुंबई : मागील काही दिवसांपूर्वीच ‘फूड डिलिव्हरी सेगमेंट’मधील ‘झोमॅटो’ कंपनीचा आयपीओ (IPO) आला होता, ज्याला सुरुवातीच्या काळात गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर आता झोमॅटोची प्रतिस्पर्धी फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीही (Swiggy) शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी करीत आहे.

Advertisement

Swiggy कंपनी 800 मिलियन डॉलर, म्हणजेच 6,000 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारीत आहे. स्विगीने ताज्या फंडिंग राउंडमध्ये आपले व्हॅल्युएशन 10.7 बिलियन डॉलर केले आहे, जे दुप्पट आहे. फक्त ‘फूड डिलिव्हरी’ न करता, एक लॉजिस्टिक कंपनी म्हणून स्विगीला स्वतःला प्रोजेक्ट करायचे आहे. कंपनीने आयपीओ आणण्यापूर्वी स्वतंत्र संचालकांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.

Advertisement

2021 मध्ये झोमॅटो कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली, ज्याला सुरुवातीला गुंतवणुकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, लिस्टिंगनंतर झोमॅटोने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. झोमॅटोचा आयपीओ 76 रुपये प्रति शेअर या भावाने आला, जो 169 रुपयांवर गेल्यानंतर आता 80 रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या ऑर्डर व्हॅल्यूच्या वाढीने निराशा केली आहे.

Loading...
Advertisement

स्विगी व झोमॅटोच्या विक्रीची तुलना केल्यास स्विगीने डिसेंबर-2021 मध्ये 250 मिलियन डॉलरची विक्री केली. त्याच वेळी झोमॅटोने ऑक्टोबर ते डिसेंबर-2021 मध्ये 733 मिलियन डॉलरची विक्री दर्शविली. भारतातील फूड डिलिव्हरी व्यवसाय असो, किराणा डिलिव्हरी व्यवसायाने कोरोना महामारीच्या काळात प्रचंड वाढ दर्शविली आहे. स्विगीने ‘क्विक कॉमर्स डिलिव्हरी सेगमेंटमध्ये’ पाऊल ठेवलंय, ज्यात टाटा समूहाच्या बिग बास्केट, रिलायन्स इंडस्ट्रीज-समर्थित ‘डुन्जो’ (Dunzo) द्वारे आव्हान दिले जात आहे.

Advertisement

Gold Price : आज सलग दुसऱ्या दिवशी सोने चमकले; सोने भाववाढीत ‘त्या’ संकटाने अशी केलीय मदत; जाणून घ्या.. नवे दर..
युक्रेन-रशिया वादाचा आपल्यावरही होतोय ‘असा’ इफेक्ट.. पहा, कसे बिघडतेय घर खर्चाचे गणित..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply