Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उसाच्या ‘एफआरपी’बाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना बसणार फटका..

मुंबई : दरवर्षी उसाचा गाळप हंगाम सुरू झाले की एका मुद्द्याची हमखास चर्चा होते, ती म्हणजे उसाला मिळणारा एफआरपी (FRP)… कारखान्यांकडून शेतकऱ्यांना दोन-तीन टप्प्यांत त्यांच्या घामाचे दाम दिले जात होते. त्यामुळे ‘एफआरपी’ची रक्कम एकाच टप्प्याची मागणी शेतकरी, विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर ‘एफआरपी’बाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, उसाचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना ‘एफआरपी’चे दोन तुकडे करण्यात आले आहेत. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Advertisement

राज्य सरकारचा निर्णय
राज्य सरकारने महसूल विभागनिहाय अंदाज साखर उतारा निश्चित करुन त्यानुसार ‘एफआरपी’ निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. 2021-22 व पुढील हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीचा किमान ‘एफआरपी’ देण्यासाठी पुणे व नाशिक विभागासाठी 10 टक्के, तर औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागासाठी 9.50 टक्के उतारा निश्चित केला आहे. अंतिम उतारा निश्चित करुन उर्वरित ‘एफआरपी’ देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन टप्प्यात ‘एफआरपी’ मिळणार आहे.

Advertisement

शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ देताना मागील हंगामातील साखर उतारा व तोडणी, वाहतूक खर्च विचारात घेतला जाईल, असा आदेश सरकरने दिला आहे.. मात्र, हंगामाच्या अखेरीस उतारा व तोडणी, वाहतूक खर्च निश्चित होतात. तोपर्यंत साडेनऊ ते दहा टक्के साखर उताऱ्यानुसार ‘एफआरपी’ देण्याचे निर्देशही दिले आहेत.

Loading...
Advertisement

केंद्राच्या ऊस दर नियंत्रण आदेश 1966 अन्वये मागील हंगामाच्या साखर उताऱ्यानुसार ‘एफआरपी’ची रक्कम निश्चित होते. त्या रकमेतून मागील हंगामाचाच ऊस तोडणी, वाहतूक खर्च वजा करून उरलेली रक्कम शेतकऱ्याला उस तुटल्यावर 15 दिवसांत देणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने 22 ऑक्टोबर 2020 च्या अधिसूचनेनुसार ‘एफआरपी’ जाहीर करण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत.

Advertisement

युक्रेन-रशिया वादाचा आपल्यावरही होतोय ‘असा’ इफेक्ट.. पहा, कसे बिघडतेय घर खर्चाचे गणित..?
वाव.. फक्त 580 रुपयांत तब्बल 1000 हजार किलोमीटर.. पहा, ‘ही’ आहे टाटाची जबरदस्त इलेक्ट्रिक कार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply