Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

एसटी संपावर हायकोर्टात सुनावणी, न्यायालयाने काय निर्णय दिलाय, वाचा..

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी 28 ऑक्टोबर 2021 पासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला असून, त्यावर आज सुनावणी झाली. त्यात राज्य सरकारने हायकोर्टासमोर बाजू मांडली.. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाची मागणी सोडल्यास इतर सर्व मागण्या मान्य केल्याचे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितलं.

Advertisement

दरम्यान, समितीने आजच हायकोर्टात आपला अहवाल सादर केला. त्यामुळे हा अहवाल वाचनासाठी वेळ मिळावा, म्हणून न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी घेण्याचा निर्णय दिला. आता एसटी संपावर नि विलिनीकरणाच्या मागणीवर येत्या शुक्रवारी (ता. 25) सुनावणी होणार आहे. हायकोर्टाच्या निर्णयाकडे संपकरी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे..

Advertisement

आता कामावर या..
परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, की उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने त्यांचा अहवाल आज वकिलांमार्फत सादर केला. अहवालाची एक प्रत कामगारांच्या वकिलांना दिली आहे. कोरोना काळात ज्यांनी काम केलं, त्यांना भत्ता दिला, ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना 50 लाख रुपये दिले. विलिनिकरणाबाबतचा अहवाल उच्च न्यायालयाकडे दिला आहे. त्याचा अभ्यास करून पुढचा निर्णय देऊ.

Loading...
Advertisement

शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. एसटी संपाचा विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य लोकांना मोठा फटका बसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर यावं, लाखो लोकांना त्रास होतोय, तो कमी करावा, एसटीचं नुकसान करु नये, असं आवाहन परब यांनी केलं.

Advertisement

अजब-गजब : अवघे कोरोनाने हैराण.. पण, या 8 देशांत कोरोना आलाच नाही; पहा, देशांनी कसे रोखले या संकटाला..
Reliance Jio चे जबरदस्त प्लान..! मिळतोय तब्बल 150GB डेटा.. पहा, कोणते मिळतात फायदे..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply