मुंबई : ‘आयपीएल 2022’च्या हंगामासाठी नुकताच मेगा ऑक्शन झाला.. त्यात खेळाडूंना विकत घेण्यासाठी संघ मालकांनी कोट्यवधी रुपयांची उधळण केली. काही खेळाडूंसाठी अनपेक्षित रकमेची बोली लागली, त्याच वेळी अनेक दिग्गज खेळाडूंसाठी कोणीच पुढे झाले नाही.. त्यात सगळ्यात मोठं नाव होतं, ‘मिस्टर आयपीएल’ या नावाने लोकप्रिय असणारा सुरेश रैना.. ‘सीएसके’साठी अनेक वर्षे खेळल्यावरही रैनावर त्यांनी विश्वास दाखवला नाही.. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले..
Please @ImRo45 consider #SureshRaina for #MumbaiIndians team.🙏🇮🇳💙💙#Boycott_ChennaiSuperKings pic.twitter.com/yiCiZX0gbc
Advertisement— Jyoti Suman (@Jas23478675) February 15, 2022
Advertisement
https://platform.twitter.com/widgets.js
रैनाचा व्हिडिओ व्हायरल
आता रैनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.. अर्थात हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.. या व्हिडीओत रैना ‘बीसीसीआय’ला (BCCI) एक विनंती करताना दिसत आहे. तो म्हणतो, की ‘जे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीत, निदान त्यांना तरी परदेशातल्या लीग खेळायला परवानगी द्यावी. तुम्ही आयपीएल आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही नाही. आता स्थानिक क्रिकेटमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉम्पिटिशन आहे. आम्ही काही महिने क्वालिटी क्रिकेट खेळलो, मग ते CPL असो किंवा BBL, आता आम्ही तयार आहोत, असं वाटेल. बाहेरच्या देशाचे खेळाडू खेळतात नि मग त्या देशाच्या टीममध्ये पुनरागमन करतात. आमच्यासारख्यांकडे दुसरा कोणताही बी प्लान नाही..’
‘आयपीएल-2022’च्या लिलावात रैनावर त्याची जुनी टीम सीएसकेनेही (CSK) बोली लावली नाही. रैनाने त्याची बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली होती. 2008 पासून रैना चेन्नईच्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू होता. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करत रैनाने कायमच ‘सीएसके’साठी संकटमोचकाची भूमिका बजावली. आयपीएल इतिहासात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये रैना चौथ्या क्रमांकावर आहे. 205 सामन्यांमध्ये रैनाने 5,528 रन केले. रैनाच्या पुढे फक्त विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा आहेत.
किंग कोहलीने शेअर केला ‘तो’ फोटो; अन् फॅन्स म्हणतात, हा तर बाबर आझम …
‘त्या’ आरोपांवर अखेर राहुल द्रविडने सोडला मौन; दिली मोठी प्रतिक्रिया