Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजाराला अस्थिरतेचा फटका, ‘पेटीएम’ची घसरण थांबेना..

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर आज पाहायला मिळाला.. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज (सोमवारी) शेअर बाजारात तेजी-घसरणीचं सत्र दिसलं. आज सकाळी शेअर बाजाराचे दोन्ही इंडेक्स रेड मार्कवर उघडले. दिवसभर बाजारात अस्थिरता दिसून आली.

Advertisement

ट्रेडिंगच्या अखेरीस बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 149.38 अंकांनी किंवा 0.26 टक्क्यांनी घसरून 57,683.59 वर बंद झाला. त्याच वेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स (NSE) निफ्टी 69.60 अंकांनी, म्हणजेच 0.40 टक्क्यांनी घसरून 17,206.70 वर बंद झाला. दिवसभरात सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे सेंन्सेक्स व निफ्टीमध्ये ही घसरण झाल्याचे पाहायला मिळाले..

Advertisement

निफ्टी (NIFTY) वर मेटल इंडेक्स (METAL INDEX) 2 टक्क्यांनी घसरला. पीएसयू बँक, फार्मा आणि रिअल्टी शेअरवर विक्रीचा दबाव कायम होता. बँक आणि फायनान्शियल इंडेक्सची ‘निफ्टी’वर समाधानकारक कामगिरी राहिली. सेन्सेक्समधील 30 पैकी 21 शेअरमध्ये घसरण झाली.

Advertisement

टाॅप गेनर्स
• विप्रो(1.48)
• इन्फोसिस(1.39)
• श्री सिमेंट(1.35)
• पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन(1.25)
• आयसीआयसीआय बँक(0.74)

Loading...
Advertisement

टाॅप लूजर्स
• कोल इंडिया(-3.65)
• हिंदाल्को(-3.32)
• यूपीएल(-2.87)
• ओएनजीसी(-2.68)
• अदानी पोर्ट्स (-2.25)

Advertisement

आजच्या घसरणीच्या शेअर्समध्ये सन फार्मा (SUNPHARMA), टीसीएस (TCS), आयटीसी (ITC) यांचा समावेश होता. पेटीएम (Paytm) शेअर्सच्या घसरणीचे सत्र अजूनही थांबलेले नाही. आज तर कंपनीच्या शेअर्स नीच्चांकी 816 रुपयांवर पोहोचला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी हा शेअर 833 रुपयांवर बंद झाला होता.

Advertisement

गेल्या आठवड्याभरात युक्रेन-रशिया वादाचे पडसाद भारतासह आंतरराष्ट्रीय अर्थजगतावर उमटले. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनानंतर वातावरणातील तणाव निवळला होता. मात्र, पुन्हा एकदा वादानं डोकं वर काढलं आहे.

Advertisement

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, सात-बारा उताऱ्यावरील ‘पोटखराबा’ क्षेत्राबाबत मोठा निर्णय..
पेट्रोल-डिझेल राहिले आता विमानाच्या इंधनाकडे सरकारचा मोर्चा.. पहा, सरकारने काय केलीय तयारी..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply