Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, सात-बारा उताऱ्यावरील ‘पोटखराबा’ क्षेत्राबाबत मोठा निर्णय..

मुंबई : जमीन क्षेत्राचा उल्लेख सात-बारा उताऱ्यावर आहे, पण पोटखराबा म्हणून.. ज्या शेतीचा पीक उत्पादनासाठी वापर करता येत नाही, अर्थात लागवडीयोग्य नसलेले क्षेत्र म्हणजे, पोटखराबा.. अगदी ब्रिटीश काळापासून करण्यात आलेल्या नोंदी आजतागायत कायम आहेत. गेल्या काही दिवसांत माणसांची संख्या वाढली, शेती तेवढीच राहिली.. शेतीचा आकार लहान लहान होत गेला, तसा खडकाळ माळरानही वहितीखाली आले.. पोटखराबा क्षेत्रावर शेतकरी आता चांगले पीक उत्पादनही घेतात, पण सात-बारा उताऱ्यावर या क्षेत्राचा उल्लेख ‘पोटखराबा’ म्हणूनच राहिला.. त्यामुळे शासनाच्या विविध योजना, पीक कर्ज, पीकविमा, शासनाची नुकसान भरपाई मिळवताना शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या..

Advertisement

अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. पोटखराबा जमिनीबाबत राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारने सात-बारा उताऱ्यावरील ‘पोटखराबा’ हा उल्लेख काढण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे एकूण जमीन क्षेत्रातच पोटखराबा क्षेत्र जमा केले जाणार आहे.. जळगाव जिल्ह्यातून या उपक्रमाची सुरुवात केली जाणार असल्याचे समजते. यासंबंधीची प्रक्रिया कसे असेल, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. पोटखराबा क्षेत्राचा उल्लेख वहिवाटाखालील क्षेत्रात केला जाणार आहे.

Loading...
Advertisement

अशी असेल प्रक्रिया..

Advertisement
  • महसूल विभागा अंतर्गत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सुरवातीला तलाठी पाहणी करणार असून, या दरम्यान शेतकऱ्यांना 16 प्रकाराचे अर्ज तलाठ्यांकडे जमा करावे लागतील.
  • पोटखराबा जमिन वहिवाटाखाली आणण्यासाठी तलाठ्याला गावातील गट क्रमांक निहाय जमिनीची माहिती संकलित करावी लागणार आहे.
  • नंतर जबाब, पंचनामा आणि हस्तकेच नकाशा तयार करावा लागणार आहे. हा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागेल..
  • मंडळ अधिकारी या अहवालातील 10 टक्के गट शिवाराची पाहणी करतील नि आपला अभिप्राय तहसीलदारांना देतील.
  • तहसीलदार हे गावनिहाय माहिती उपअधीक्षक भूमीअभिलेख यांच्याकडे अभिप्रायसाठी पाठवतील. भूमी अभिलेखचे उपअधीक्षक हेच पोटखराबा जमिन वहिवाटाखाली येणार का नाही, याचा अहवाल तहसीलदारांना देतील.
  • अंतिम टप्प्यात भूमी अभिलेख कार्यालयाकडून आलेला अहवाल हा तहसीलदार, तलाठ्यांकडे आल्यानंतर त्यावरील पोटखराबा क्षेत्र हे वहिवाटाखाली आल्याची नोंद सात-बारा उताऱ्यावर केली जाणार आहे.

नाश्त्यासाठी कमी वेळात तयार करा टेस्टी बेसन ब्रेड टोस्ट.. रेसिपीही आहे एकदम सोपी..
तिसऱ्या T-20 सामन्यातही विंडीजचा धुव्वा.. सहा वर्षांनंतर क्रमवारीत भारत पोहोचला या स्थानावर

Advertisement
Advertisement

Leave a Reply