Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Weather Update : तरीही देशात ‘या’ राज्यात आहे पावसाचा अंदाज; पहा, काय आहेत हवामान बदलाची कारणे..?

दिल्ली : देशात आता हिवाळा शेवटच्या टप्प्यात आहे. तर उन्हाळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दोन दिवसांपासून दिल्ली आणि परिसरात जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे हवामानातील बदल पुन्हा एकदा जाणवत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिल्लीशेजारील अनेक राज्यांमध्ये जोरदार वारे सुरू राहतील असे म्हटले आहे. याशिवाय अनेक राज्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड आणि उत्तर राजस्थानमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.

Advertisement

भारतीय हवामान विभागाचे म्हणणे आहे, की 21 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन भागात अशांतता म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येईल. यामुळे दक्षिण-पश्चिम राजस्थानमधील अनेक भागात चक्री वारे वाहू शकतात. मंगळवारी दिल्ली, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये 25 ते 35 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बेंसच्या प्रभावामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

स्कायमेटच्या (skymate) मते, गेल्या 24 तासांत आसाम, दक्षिण तामिळनाडू, ओडिशा आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात हलका पाऊस पडला. अंदमान आणि निकोबार बेटांवर एकाकी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस नोंदला गेला. विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, किनारी ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशात एक-दोन ठिकाणी हलका पाऊस पडला. राजस्थान, गुजरातचा काही भाग आणि पश्चिम मध्य प्रदेशात किमान तापमानात 2 ते 4 अंशांची घसरण झाली आहे.

Loading...
Advertisement

स्कायमेट वेदरनुसार, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्रालगतच्या भागात चक्रीवादळाचे परिवलन कायम आहे. पुढील 24 तासांत ईशान्य भारतातील हवामान बदलण्याची शक्यता आहे. येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय दक्षिण तामिळनाडू आणि केरळमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. उर्वरित देशातील हवामानात कोणताही विशेष फरक पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.

Advertisement

Weather Update : कुठे होणार पाऊस आणि कुठे राहणार कडाक्याचा हिवाळा; पहा, काय म्हटलेय हवामान विभागाने

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply