मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांमध्ये (dearness allowance) मार्च महिन्यात वाढ होणार, तसेच 18 महिन्यांपासून थकीत असलेली डीए रक्कम होळीच्या सणाला मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता ही चर्चा फोल ठरताना दिसत आहे. कारण, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा डीए म्हणजे महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम मिळणार नसल्याची माहिती समोर आली असून, मोदी सरकारने (Central government) तसा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली.
जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत डीएची थकबाकी आहे. मोदी सरकारने याबाबतचे निवेदन जारी केले असून, त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. डीएची रक्कम मिळणार नसली, तरी होळीच्या दिवशी सरकार डीएमध्ये वाढ करून कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के डीए मिळत आहे. परंतु, तो वाढून 34 टक्के होणार असल्याचे समजते..
कोरोना संकटामुळे मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थांबवला होता. या पैशातून गरीब आणि गरजूंना सरकार मदत करू शकेल, या उद्देशाने महागाई भत्ता दिला नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काही दिवसांपूर्वी एक निवेदन जारी करून सांगितले होते. कोरोनामुळे मंत्री, खासदारांच्या पगारातही कपात करण्यात आली होती. परंतु, गेल्या वर्षभरापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही कपात केली नव्हती. तसेच कर्मचाऱ्यांच्या डीएमध्येही कपात झाली नव्हती, असे सांगण्यात आले..
केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्याची थकबाकी मिळणार नसली, या वेळी तीन टक्के वाढ मिळणार आहे. त्यामुळे सध्याचा 31 टक्के असणारा महागाई भत्ता वाढून तो 34 टक्के होणार आहे. ‘एआयसीपीआय इंडेक्स’ (AICPI Index)च्या अंदाजानुसार, डिसेंबर 2021 च्या निर्देशांकात एका अंकाची घट झाली आहे. महागाई भत्त्याचा सरासरी निर्देशांक 351.33 एवढा राहिला. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34.04 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज आहे..
समजा, एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार (basic salary) 18 हजार रुपये असेल, तर त्याला 34 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. या हिशेबानेच पगारात वर्षाला 73 हजार 440 रुपयांची वाढ होऊ शकते. मूळ पगारात वार्षिक 6 हजार 480 रुपयांची वाढ हाईल. सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू असून, त्याची आचार संहिता लागलेली आहे. त्यामुळेच सरकार महागाई भत्त्याबाबत लगेच घोषणा करू शकत नाही. मात्र, मार्चमध्ये याबाबतची घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले..
फक्त 6 हजारांत एक एकर जमीन, तीही थेट चंद्रावर.. कशी खरेदी करायची, वाचा..!
एका झटक्यात सुटणार तंबाखूचे व्यसन, ‘डब्लूएचओ’ने आणलंय त्यासाठी खास अॅप..!