Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फक्त 6 हजारांत एक एकर जमीन, तीही थेट चंद्रावर.. कशी खरेदी करायची, वाचा..!

मुंबई : सध्या गुंठाभर जमीन घ्यायची म्हटली, तरी सारा खिसा खाली होतो. जमिनीचे बाजार गगणाला भिडले आहेत. अशा वेळी फक्त 6 हजारांत एक एकर जमीन मिळत असेल, तर.. वाचून आश्चर्य वाटलं ना.. पण हे खरंय.. तुम्हाला अवघ्या 6 हजारांत 1 एकर जमीन खरेदी करता येणार आहे.. आता त्यासाठी थोडी खटापट करावी लागेल इतकेच.. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, फक्त 6 हजारांत कशी नि कुठे जमीन मिळणार, असा.. तर ही जमीन तुम्हाला चंद्रावर मिळणार आहे.. त्यासाठी रितसर खरेदीखतही केले जाते.. आता त्या जमिनीचे काय करायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न…!

Advertisement

नुकताच प्रेमीयुगुलांचा खास दिवस म्हणजे, व्हेलेंटाईन-डे साजरा झाला… त्यात अनेकांनी आपल्या आवडत्या व्यक्तीला काही ना काही गिफ्ट दिले… या दिवसाचे औचित्य साधून त्रिपुरातील एका प्राध्यापकाने स्वत:च स्वत:ला ‘व्हॅलेटाईन गिफ्ट’ दिलं. ते म्हणजे, चंद्रावरची एक एकर जमीन.. ही जमीन या प्राध्यापक महाशयांनी अगदी कमी किंमतीत म्हणजे, फक्त 6 हजार रुपयांमध्ये खरेदी केली.

Advertisement

सुमन देबनाथ, असे जमीन खरेदी करणाऱ्या त्रिपुरातील या प्राध्यापकाचं नाव.. ते गणिताचे प्राध्यापक आहेत. खासगी क्लासमध्ये ते गणित शिकवतात. चंद्रावर त्यांनी एक एकर जमीन खरेदी केली असून, या जमीन खरेदीचे सगळी कागदपत्रे लवकरच मिळणार असल्याचं त्यांनी सांगितले..

Loading...
Advertisement

कशी केली डील?
चंद्रावर जमीन खरेदीचा अनुभवही प्रा. सुमन यांनी सांगितला. त्यांच्या माहितीनुसार, ‘इंटरनॅशनल लूनर सोसायटी’ चंद्रावरील जमीन खरेदीबाबतचे करार करते. त्यांच्या माध्यमातूनच सुमन देबनाथ यांनी चंद्रावर अवघ्या सहा हजारांत जमिनीची डील केली. या सहा हजार रुपयांमध्ये शिपिंग आणि पीडीएफ चार्जदेखील आकारण्यात आला आहे.. इंटरनॅशनल लूनर सोसायटीच्या माध्यमातून चंद्रावरील जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

Advertisement

बरं.. चंद्रावर जमीन घेणारे प्रा. सुमन ही काही पहिलीच व्यक्ती नाही.. याआधीही अनेकांनी चंद्रावरील जमीन खरेदी केलेली आहे. अगदी त्यात बाॅलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग याचाही समावेश आहे.. काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील एका मित्राने आपल्या मित्राला बर्थ-डे गिफ्ट म्हणून चंद्रावरील जमीन दिली होती. त्रिपुरातील सुमन देबनाथ यांच्या ओळखीच्या आणखी एकाने अशा प्रकारे चंद्रावर जमीन घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर सुमन यांनीही जमीन खरेदी केली. अनेक सेलिब्रिटिंनीही चंद्रावर जमीन घेतल्याचे फार कुतूहल होतं. म्हणून चंद्रावरील जमीन खरेदीचा मोह आवरला नसल्याचे प्रा. सुमन यांनी सांगितले..

Advertisement

तिसऱ्या T-20 सामन्यातही विंडीजचा धुव्वा.. सहा वर्षांनंतर क्रमवारीत भारत पोहोचला या स्थानावर
एका झटक्यात सुटणार तंबाखूचे व्यसन, ‘डब्लूएचओ’ने आणलंय त्यासाठी खास अ‍ॅप..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply