मुंबई : तंबाखू आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे तंबाखू, सिगारेटच्या पाकिटावरच लिहिलेले असते. हे व्यसन सोडण्याची अनेकांची इच्छाही असते. त्यासाठी काही जण प्रयत्नही करतात. मात्र, काही केल्या हे व्यसन सुटत नाही.. त्यातून अनेकदा कॅन्सरसारख्या दुर्धर आजारालाही सामाेरे जावे लागते. काहींचा त्यात जीवही गेला आहे..
जगभरात दरवर्षी 80 लाख लोकांचा मृत्यू तंबाखूच्या व्यसनामुळे होत असल्याची जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी आहे. त्यात आग्नेय आशियातील 16 लाख लोकांचा समावेश आहे. भारताचा समावेश असलेल्या आग्नेय आशियामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. तसेच या प्रदेशातच तंबाखूचे सर्वाधिक सेवन केलं जातं.
सर्वच प्रकारातील तंबाखू आरोग्यासाठी हानीकारक आहे. जगभरातील तरुणाई सध्या सिगारेटच्या व्यसनात गुरफटली आहे. अशा व्यसनापासून सुटका करुन घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना, अर्थात ‘डब्लूएचओ’ने उपाय शोधलाय. त्यामुळे सर्व प्रकारच्या तंबाखूच्या व्यसनांपासून सुटका होईल, असा दावा ‘डब्लूएचओ’ने केला आहे..
‘क्विट टोबॅको’ अॅप
जागतिक आरोग्य संघटनेने ‘क्विट टोबॅको’ हे अॅप (Quit Tobacco App) लॉन्च केलं आहे… तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी हे अॅप मदत करील. या अॅपच्या माध्यमातून जनजागृती होईल, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाचे प्रादेशिक संचालक खेत्रपाल सिंह यांनी व्यक्त केलं.
‘डब्लूएचओ’ने पहिल्यांदाच अशा प्रकारचे अॅप लाॅंच केले आहे. या अॅपच्या माध्यमातून तंबाखूच्या सर्व प्रकारच्या (सिगारेट, तंबाखू) व्यसनापासून सुटका होण्यास मदत मिळणार आहे. तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी, तंबाखूची तल्लफ कमी करण्यासाठी हे अॅप मदत करणार आहे. त्यामुळे समाजातील व्यसनाधीनता कमी होणार असल्याचे सांगण्यात आले..
Corona Update : जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ.. पहा, कोरोनाबाबत काय आहे अपडेट..
Recipe : कमी वेळात ‘अशा’ पद्धतीने तयार करा टेस्टी अन् हेल्दी इडली.. ही आहे सोपी रेसिपी..