Take a fresh look at your lifestyle.

BCCI ने घेतला मोठा निर्णय; ‘हा’ खेळाडू होणार भारताचा नवीन कर्णधार

मुंबई – रोहित शर्मा (Rohit Sharma) आता वनडे आणि टी-20 नंतर कसोटी संघाचा कर्णधार बनणार आहे. बीसीसीआयने (BCCI) तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार पॉलिसीकडे वळण घेतले आहे. रोहितच्या नावावर पुढील आठवड्यात शिक्कामोर्तब होऊ शकते. यादरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही संघ निवडला जाईल.

Advertisement

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, निवडकर्ते, खेळाडू, प्रशिक्षक या सर्वांना रोहित शर्माने कर्णधार बनवायचे आहे. पुढील आठवड्यात श्रीलंकेसोबतच्या मालिकेसाठी संघ निवड झाल्यानंतर रोहितच्या कसोटी कर्णधारपदी नियुक्तीची अधिकृत घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले.

Advertisement

नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपद सोडले होते. यानंतर आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला टीम इंडियाचा (Team India) कसोटी कर्णधार बनवण्यात आलेले नाही.

Advertisement

ही मालिका 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने मंगळवारी टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी-20 आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 24 फेब्रुवारीपासून श्रीलंका संघाचा दौरा सुरू होणार आहे. मोहाली येथे 4 मार्चपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. माजी कर्णधार विराट कोहली मोहालीत 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात रोहित त्यांचा कर्णधार असेल. या मालिकेतील पहिला T20 सामना लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळत आहे. 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत मालिका 3-0 ने जिंकली. रोहितच्या नेतृत्वाखाली, भारताने 39 वर्षानंतर प्रथमच वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात क्लीन स्वीप केला.

Advertisement

16 फेब्रुवारीपासून उभय संघांमधील टी-20 मालिका सुरू होणार आहे. या वर्षी टी-20 विश्वचषकही खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply