Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

निवडणुकीत भरलाय श्रीमंतांचा मेळा..! पहा, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत किती आहेत अब्जाधीश अन् कोट्याधीश ?

दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी कोट्याधीश उमेदवारांची संख्या मोठी आहे, तर 6 अब्जाधीश उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि Myneta.info यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार रविवारपर्यंत दाखल केलेल्या 1199 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यापैकी 6 जणांनी त्यांची 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त चल-अचल संपत्ती जाहीर केली आहे. यापैकी 2 उमेदवार भाजप, तर 2 समाजवादी पार्टी (एसपी) आणि कॉंग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार आहे.

Advertisement

ADR अहवालानुसार, आतापर्यंत 113 विधानसभा जागांवर 1199 उमेदवारांचे विश्लेषण करण्यात आले आहे, त्यापैकी 540 म्हणजेच 45 टक्के उमेदवार कोट्याधीश आहेत. या अहवालात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, आतापर्यंत नोंदणी केलेल्या 51 टक्के उमेदवारांनी त्यांचे पदवी किंवा त्यापुढील शिक्षण पूर्ण केले आहे. म्हणजेच यावेळी सुशिक्षित उमेदवारांची संख्याही जास्त आहे.

Advertisement

या राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते, उमेदवार, कार्यकर्ते जोरदार प्रचार करत आहेत. आणखी 5 टप्प्यातील मतदान बाकी आहे.  या वेळी उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापैकी पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, चौथ्या टप्प्यात 60, पाचव्या टप्प्यात 60 जागांवर, सहाव्या टप्प्यात 57 आणि सातव्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे.

Loading...
Advertisement

10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर 14 फेब्रुवारीला दुसरा टप्पा पार पडला आहे. आता 20 फेब्रुवारीला तिसरा टप्पा, 23 फेब्रुवारीला चौथा टप्पा, 27 फेब्रुवारीला पाचवा टप्पा, 3 मार्चला सहावा टप्पा आणि 7 मार्चला सातवा टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत आपणच विजयी होणार असे दावे प्रत्येक पक्षाचे नेते करत आहेत. मात्र, निवडणुकीचे खरे चित्र 10 मार्च रोजी निकाल जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement

बंगालमध्ये भाजपला आणखी एक झटका..! ‘त्या’ समस्येला रोखण्यात भाजप ठरतोय अपयशी; पहा, आता काय घडलेय..?

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply