Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का..! ‘या’ दिग्गज नेत्याने दिला राजीनामा; जाणून घ्या, काय आहे कारण

दिल्ली : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय कायदा मंत्री अश्वनी कुमार यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. कुमार यांनी आज सकाळी काँग्रेस अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला आणि पक्षाबाहेर राहून देशासाठी अधिक चांगले काम करू शकतो, असे सांगितले. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये ते कायदामंत्री होते.

Advertisement

कुमार यांनी पत्रात लिहिले आहे, की या प्रकरणाचा विचार केल्यानंतर, मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे की, सध्याच्या परिस्थितीत आणि माझ्या प्रतिष्ठेनुसार, मी पक्षाच्या बाहेर राष्ट्रीय कार्य अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. 46 वर्षांनंतर मी पक्ष सोडत आहे.

Advertisement

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, की काँग्रेस आता तसा पक्ष राहिलेला नाही, जसा आधी होता. पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आमच्याकडे गतिमान आणि प्रेरणादायी नेतृत्व नाही. मी राजकारण किंवा सार्वजनिक सेवा सोडलेली नाही. मी देशाप्रती असलेले माझे कर्तव्य पार पाडत राहीन. द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, कुमार यांनी या निर्णयाचे श्रेय पक्षातील नेतृत्वाचा अभाव यास यांना दिले. त्यांच्या दोन पिढ्या काँग्रेसबरोबर होत्या. कुमार म्हणतात, की काँग्रेस पुन्हा स्वतःला शोधू शकली नाही आणि पडझड सुरूच राहिली. ज्येष्ठ वकील कुमार 2002 ते 2016 या काळात तीन वेळा राज्यसभेचे सदस्य होते. ते अतिरिक्त सॉलिसिटर जनरलही राहिले आहेत.

Loading...
Advertisement

याआधी 25 जानेवारी रोजी माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या प्रमुख नेत्यांच्या यादीत आता अश्विनी कुमार यांचा समावेश झाला आहे, ज्यांची एकेकाळी काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका मानली जात होती. याआधी ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता अश्विनी कुमार यांच्या रुपाने आणखी एका दिग्गज नेत्याने कांग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

Advertisement

.. म्हणून ‘या’ काँग्रेस नेत्याने सांगितलाय ‘NDA’ चा अर्थ.. तुम्ही सुद्धा माहिती करुन घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply