Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी.. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती आक्रमक, घेतला निर्णायक पवित्रा..

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje Chhatrapati) यांनी आज मोठी घोषणा केली. गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी येत्या 26 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा संभाजाराजे छत्रपती यांनी केली.

Advertisement

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, की “मी एकटा आमरण उपोषण करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती, बारा बलुतेदारांना घेऊन स्वराज्य स्थापन केले. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांना 50 टक्के आरक्षण दिलं. त्यात अनूसूचित जाती, अनूसूचित जमाती, ओबीसीसह मराठा समाजाचा समावेश होता. मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मी 2007 पासून महाराष्ट्र पिंजून काढला. त्यावेळी मराठा समाज हा बहुजन समाजाचा भाग आहे. मराठा समाज आणि बारा बलुतेदारांना एकत्र कसं आणता येईल, यासाठी प्रयत्न केला.”

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी मराठा समाजाचे आरक्षण रद्द ठरवलं. त्यानंतर अनेकदा आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला, आक्रमक आंदोलन केली. मात्र, आता मी उद्विग्न झालोय. माझा कोणत्याही पक्षातील नेत्यांना विरोध नाही. आरक्षण रद्द झालं, त्यावेळी सगळ्या घटकांना एकत्र घेऊन आपलं आरक्षण रद्द कसं झालं, यासंदर्भात राजकीय नेत्यांसमोर भूमिका माडंली, असे ते म्हणाले.

Loading...
Advertisement

ते म्हणाले, की मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रासमोर वेळोवेळी भूमिका मांडत आलोय. सर्वोच्च न्यायालयात पूनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली, पण वेळ गेल्यानंतर ती याचिका फेटाळली गेली. त्यानंतर भोसले समिती स्थापन करण्यात आली. मराठा समाजाचा सामाजिक मागासलेपणा सिद्ध होत नाही, तोपर्यंत समाजाला आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयाने पुढारलेला समाज असल्याचे म्हटलंय.

Advertisement

केंद्र सरकारने राज्यांना अधिकार देण्यास सांगितले, पण सध्या 52 टक्के आरक्षण असताना, 50 टक्क्यांमध्ये आरक्षण कसं देणार.? मी सत्ताधारी पक्षाला राज्यसभेत बोलायची विनंती केली. मात्र, मला बोलू दिलं गेलं नाही. मग, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हस्तक्षेप केला. केंद्र सरकारने सरसकट सामाजिक मागास असलेल्या जाट, गुर्जर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

Advertisement

धक्कादायक.! शेअर बाजाराची सुरुवात खळबळजनक, सेन्सेक्स-निफ्टीत प्रचंड मोठी घसरण..!
सोन्याला झळाळी कायम.. गुंतवणुकदारांसाठी सोने खरेदीची मोठी संधी..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply