Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक.! शेअर बाजाराची सुरुवात खळबळजनक, सेन्सेक्स-निफ्टीत प्रचंड मोठी घसरण..!

मुंबई :  जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. जगातील महत्वाच्या शेअर बाजारांमध्येही घसरण नोंदवण्यात आली होती. त्यामुळे भारतीय बाजारांमध्येही गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला.

Advertisement

मागील काही दिवसांपासून सातत्याने अस्थिर असलेल्या शेअर बाजारासाठी आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवातही निराशाजनक झाली. आजच्या (Share Market) व्यवहारावर ABG शिपयार्ड घोटाळ्याचे सावट आहे. ABG शिपयार्डने देशातील 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आलं असून, देशातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या घोटाळ्याचा परिणाम आजच्या शेअर बाजारावर होणार असे दिसत होते नि शक्यता दिसून आली.

Advertisement

शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळते आहे. दोन्ही बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह आठवड्याची सुरुवात झाली. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 1400 अंकांपर्यंत घसरुन तो थेट 57,000 च्या पातळीपर्यंत खाली आला. त्याच वेळी निफ्टीही 17 हजारांच्या खाली घसरला. देशांतर्गत शेअर बाजारात आज दोन टक्क्यांची घसरण झाल्याने गुंतवणुकादारांना मोठा फटका बसला आहे..

Loading...
Advertisement

मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्स सकाळी 9.30 च्या दरम्यान, तब्बल 1200 हून अधिका अंकाच्या घसरणीसह सुरु झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक म्हणजेच निफ्टीमध्ये 400 हून अधिक अंकाची घसरण झाली. बाजाराच्या पडझडीचा परिणाम  बँकिंग, पायाभूत सुविधा, ऑटो फार्मा इत्यादी क्षेत्रावर दिसून आला. गुंतवणूकदारांनी या शेअर्सची जोरदार विक्री केली.

Advertisement

दलाल स्ट्रीटवरील सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात आज सुरु होते. सर्वात मोठी घसरण बँकिंग आणि वित्तीय समभागांमध्ये नोंदवली जात आहे. रशिया-युक्रेन तणावाचा परिणाम जागतिक बाजारांवरही दिसून येत आहे. जपानचा निक्केई निर्देशांकही आज 2 टक्क्यांनी घसरला. त्याच वेली कच्च्या तेलाच्या बाजारातही तेजी आली. ब्रेंट क्रूड ऑइल 1 टक्क्यांनी वाढून 95 डॉलर प्रति बॅरल झाले. या सर्व घटकांचा परिणाम आजच्या शेअर बाजारावर झाल्याचे दिसून येत आहे..

Advertisement

ड्वेन ब्राव्हो म्हणाला माझा मित्र पोलार्ड ‘मिसिंग’ आहे, जाणुन घ्या काय आहे प्रकरण
सोन्याला झळाळी कायम.. गुंतवणुकदारांसाठी सोने खरेदीची मोठी संधी..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply