Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला झळाळी कायम.. गुंतवणुकदारांसाठी सोने खरेदीची मोठी संधी..!

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज (सोमवारी) सोन्याला झळाळी मिळाल्याचे पाहायला मिळाले.. मागील आठवड्यातही सोन्यासह चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे चित्र होते. हे चित्र आजही कायम राहिले. गेल्या तीन दिवसांत सलग सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्याने सोन्याच्या दरात ही वाढ होत असल्याचे सांगण्यात येते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 100 रुपये प्रति किलोने वाढल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

भारतात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,810 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,060 रुपये होता. 22 कॅरेट सोन्यासाठी दिल्लीत सोन्याचा भाव 46,810 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोन्याच्या दरात तेजी असली, तरी विक्रमी भावापेक्षा हा दर कमीच आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांसाठी अजूनही सोने खरेदी करण्याची चांगली संधी सिद्ध होऊ शकते..

Advertisement

दरम्यान, आता सोन्याची शुद्धता घरबसल्या तपासता येणार आहे. त्यासाठी सरकारने एक अॅप तयार केले आहे. ‘बीआयएस केअर’ या अॅपद्वारे ग्राहक आपल्या सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर सोन्याबाबत कोणत्याही समस्येसाठी त्यावर तक्रारही करू शकता.

Loading...
Advertisement

तसेच, आता घरबसल्या तुम्हाला सोन्याचे दर एक क्लिकवर माहिती करुन घेता येणार आहे. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर (Retail rates) जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर काही वेळात तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या दराबाबतचा मेसेज प्राप्त होतील. शिवाय सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही www.Ibja.Co ला भेट देऊ शकता.

Advertisement

‘त्या’ प्रकरणावर जोस बटलर म्हणतो नो प्रॉब्लेम.., सोशल मीडियावर होत आहे जोराने चर्चा
‘एलआयसी आयपीओ’बाबत महत्वाची बातमी, पाॅलिसीधारकांचीही होणार चांदी..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply