Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘एलआयसी आयपीओ’बाबत महत्वाची बातमी, पाॅलिसीधारकांचीही होणार चांदी..!

मुंबई : देशभरातील गुंतवणूकदारांचे एलआयसी ‘आयपीओ’कडे लक्ष लागलेले असताना, एक महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने ‘एलआयसी’ आयपीओसाठीचा ‘ड्राफ्ट’ सेबीकडे सोपविला आहे. त्यामुळे ‘एलआयसी आयपीओ’चा महत्वाचा भाग झाला आहे. देशातील हा सर्वात मोठा ‘आयपीओ’ ठरणार असल्याचे बोलले जात आहे. एलआयसी आयपीओमध्ये कंपनीची एकूण इक्विटी साईज ही 632 कोटी शेअर एवढी प्रचंड असणार आहे. यापैकी ‘आयपीओ’चे प्रवर्तक म्हणून केंद्र सरकार जवळपास 31.6 कोटी शेअर्सची विक्री करणार आहे.. तसेच विमा कंपनीचे 5 टक्के समभाग रुपांतरीत होतील.. ‘एलआयसी’ सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी योजनेच्या 35 टक्के अथवा सुमारे 11.1 कोटी शेअर्स राखून ठेवले आहेत.

Advertisement

सामान्य गुंतवणुकदारांसोबतच ‘आयपीओ’चा काही भाग विमाधारकांसाठीही राखून ठेवला जाणार आहे. एलआयसी पॉलिसीधारकांना 10 टक्के शेअर्स मिळणार आहेत. एकूण शेअर्स पैकी सरकार 5 टक्के शेअर्स सरकार विकत असून, हा आकडा 31.6 कोटी एवढा आहे. पैकी 10 टक्के म्हणजे 3.16 कोटींहून अधिक शेअर पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. त्यामुळे पॉलिसीधारकांना हे शेअर्स मिळविण्याची मोठी संधी मिळणार आहे.

Advertisement

आयपीओ ड्राफ्टनुसार 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIBs) राखीव असतील, म्हणजे एकूण 31,62,49,885 शेअर्सपैकी अर्धे म्हणजे सुमारे 15.8 कोटी शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी असतील.. त्याच वेळी, 15 टक्के शेअर्स हे गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Loading...
Advertisement

केंद्र सरकारने 2021-22 मध्ये निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. आता सरकारने त्या्त घट करून 78 हजार कोटी रुपयांचे नवे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत सरकारला निर्गुंतवणुकीतून केवळ 12 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. अशा परिस्थितीत, लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारच्या सर्व आशा ‘एलआयसी आयपीओ’वर लागल्या आहेत.

Advertisement

बाजार मूल्यांकन किती असणार?
‘एलआयसी आयपीओ’साठी 15 लाख कोटी रुपये बाजार मूल्यांकनाचा विचार करीत आहे. मूल्यांकनाचा हा आकडा गाठण्यासाठी ‘आयपीओ’ची किंमत 2,370 रुपये प्रति शेअर ठेवावी लागेल. जर 16 लाख कोटींचे मूल्यांकन गृहित धरले, तर ‘आयपीओ’ची किंमत 2,530 रुपये प्रति शेअर होईल. तसेच मूल्यांकन 13 लाख कोटी रुपये असेल, तर प्रति शेअर 2,060 रुपये किंमत असेल. येत्या 31 मार्चपूर्वी जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक असलेली ‘एलआयसी’ शेअर बाजारात सुचीबद्ध होणार आहे.

Advertisement

Corona Update : देशात कमी होतोय कोरोना..! पहा, 24 तासात किती सापडलेत नवे रुग्ण ?
IPL Auction 2022: अर्र… मिस्टर आयपीएलसह ‘या’ स्टार्स खेळाडूंना फ्रेंचायझीने दिला धक्का

Advertisement
Advertisement

Leave a Reply