Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही वापरता का या वस्तू..? जाहिरातीतून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या ‘या’ दोन कंपन्यांना दणका..

नवी दिल्ली : विविध माध्यमांतून भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहीरातींचा ओघ सातत्याने सुरु असतो. ग्राहकांना काहीतरी आमिष दाखवून आवळा देऊन कोहळा काढण्यात येतो. बऱ्याचदा फसवणूक होऊनही ग्राहक त्याची तक्रार करीत नाही. त्यामुळेच अशा कंपन्यांचे फावते. मात्र, प्रत्येक वेळी असा फंडा चालत नाही. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दोन कंपन्यांना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) चांगलाच दणका दिला आहे. त्यात सेन्सोडाईन (Sensodyne) व नापतोल (Naaptol) या कंपन्यांचा समावेश आहे.

Advertisement

‘सीसीपीए’ने ‘नापतोल’ला 10 लाखांचा दंड ठोठावला आहे, तर ‘सेन्सोडाईन’ उत्पादन करणाऱ्या ‘ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (जीएसके) कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेड’ला (GlaxoSmithKline (GSK) Consumer Healthcare Ltd) सात दिवसांत त्यांची जाहिरात बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘सेन्सोडाईन टुथपेस्ट’ला जगभरातील दंतवैद्यांनी मान्यता दिल्याचा दावा या कंपनीने त्यांच्या जाहिरातीत केला होता. ‘नापतोल’च्या जाहिरातीमधूनही ग्राहकांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे समोर आल्याने अनुचित व्यापार पद्धतींचा वापर केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे..

Advertisement

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (ccpa) स्वतःहून या जाहिरातींची दखल घेत हा निकाल दिला. ‘सीसीपीए’ने ‘जीएसके’ला आदेश देत सात दिवसांत देशातील सर्व जाहिराती बंद करण्यास सांगितले आहे. ग्राहक संरक्षण कायद्यान्वये सेन्सोडाईन टुथपेस्टची जाहिरात दिशाभूल करणारी असल्याचे मानले आहे. ‘सीसीपीए’ने महासंचालकांना 15 दिवसांत ‘रेकमेंडेड बाय डेंटिस्ट वर्ल्डवाइड’, ‘वर्ल्ड्स नंबर 1 सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट’ या दाव्यांची खातरजमा करण्यास सांगितले आहे.

Loading...
Advertisement

कंपनीचे काय म्हणणे..?
‘जीएसके कन्झ्युमर हेल्थकेअर’च्या प्रवक्त्याने (GSK Consumer Healthcare) सांगितले की, त्यांना ‘सीसीपीए’चे आदेश मिळाले आहेत. आमची जाहीरात संबंधित कायदे आणि उद्योग मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत आहे, हे आम्ही स्पष्ट करतो. आम्ही जबाबदार कंपनी असून, नियमांचे पालन करतो. आम्ही कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहोत…’

Advertisement

आज सोन्याचे भावात किरकोळ वाढ; चांदीच्या दरात मात्र कपात; जाणून घ्या, काय आहेत नवीन भाव..
वाव.. सोन्याने दिला आधार म्हणून सरकारला मिळाला दिलासा.. पहा, यंदा नेमके काय घडलेय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply