मुंबई : टाटा नॅनो कार.. ग्राहकांना स्वस्तात मस्त सर्वात छोटी कार देण्याचे टाटा मोटर्स कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच स्वप्न होते. त्यानुसार टाटा नॅनो कारची निर्मितीही झाली. ती रस्त्यावरही धावू लागली.. पण या कारला ग्राहकांचा म्हणावा इतका प्रतिसाद मिळाला नाही नि निर्मितीनंतर काही वर्षातच या कारचे उत्पादन बंद करण्याची वेळ टाटा मोटर्सवर आली.. गेल्या दोन वर्षांत तर ‘टाटा नॅनो’च्या केवळ एक-दोनच कार तयार करण्यात आल्या.. मात्र, त्यानंतरही रतन टाटा यांनी उमेद सोडलेली नव्हती. त्यानंतर आता टाटांची ही ‘ड्रीम कार’ नव्या रंगात, नव्या ढंगात पुन्हा एकदा ग्राहकांसमोर येत आहे..
टाटा मोटर्स कंपनीने ईलेक्ट्रीकमध्ये नॅनो कार तयार केली आहे. इलेक्ट्रीक व्हेईकल्ससाठी पावरट्रेन बनविणारी कंपनी इलेक्ट्रा ईव्ही (Electra EV) या कंपनीने ‘टाटा नॅनो’ला ‘कस्टमाईज’ केले आहे. ‘टाटा नॅनो’ला ‘ईव्ही’ कारचे रुप दिले आहे. कंपनीने नुकतीच रतन टाटा यांना 72V नॅनो ईव्ही ही कार भेट दिली… ही कार रतन टाटा यांना प्रचंड आवडली. या कारमधून फेरफटका मारण्याचा मोह त्यांनाही आवरता आला नाही. रतन टाटा यांच्याकडून पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्याने कंपनीने आनंद व्यक्त केला आहे. रतन टाटा यांच्याकडून मिळालेला फिडबॅक ‘सुपर प्राऊड’ असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कारची वैशिष्ट्ये
नॅनो ईव्ही ही 4 सीटर कार असून, कार 10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0 ते 60 किमी प्रति तास वेग पकडते. त्यामध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कारचा खरा अनुभव येतो. ग्राहकांना इको-फ्रेंडली व खासगी वाहतूक प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नात कोणतीही तडजोड केलेली नसल्याचे टाटा मोटर्सचे म्हणणे आहे..
213 किमीची रेंज
कस्टम बिल्ट नॅनो ईव्ही कारमध्ये 72V आर्किटेक्चर वापरले आहे. टिगोर ईव्हीमध्येही हीच पॉवरट्रेन वापरली गेली आहे. कंपनीने त्याच्या डिझाइनमध्ये काही बदल केले आहेत. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारे प्रमाणित या कारची रेंज 213 किमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
नगर जिल्ह्यातील ‘या’ कारखान्यात भीषण स्फोट, मोठ्या प्रमाणात नुकसान..!
रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर, रेपो दराबाबत घेतला मोठा निर्णय..!