दिल्ली : जगप्रसिद्ध WWE मधून प्रसिद्ध झालेला ग्रेट खली उर्फ दिलीप सिंग राणा याने आज भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश घेतला आहे. उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू असतानाच खली याचा राजकारणातील आणि त्यातही भाजपमधील प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले. या दरम्यान खलीने सांगितले की, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय धोरणामुळे प्रभावित होऊन मी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले.
ते म्हणाले, की भाजपमध्ये सामील होताना मला आनंद होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय धोरणामुळे प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खली गुरुवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचला आणि दुपारी 1 वाजता आयोजित कार्यक्रमात खली याने भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. यानंतर भाजप नेते जितेंद्र सिंह म्हणाले, की ‘द ग्रेट खलीच्या समावेशामुळे, तो देशातील तरुणांसाठी तसेच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.’ एक व्यावसायिक कुस्तीपटू म्हणून खलीने WWE च्या अनेक महान कुस्तीपटूंबरोबर स्पर्धा केली. याशिवाय त्याने काही चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे. खली हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील आहे.
. म्हणून आता लोकांनी भाजपला मतदान करू नये.. पहा, लोकांना कुणी केलेय ‘हे’ आवाहन
. खरेदीचा आनंद आणि हमखास बचत म्हणजे आपला खरेदिवाला Kharediwala ..!
. Election 2022 : भाजपने केलाय मोठा उलटफेर.. आतापर्यंत ‘इतक्या’ आमदारांचे तिकीट नाकारले..
दरम्यान, या वर्षात देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. कोरोनाचे संकट असताना या निवडणुका होत असल्याने निवडणूक आयोगान विशेष खबरदारी घेतली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
उत्तर प्रदेशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च आणि 07 मार्च या टप्प्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल घोषित होणार आहेत. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये मात्र दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यात 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च या दोन टप्प्यात मतदान होईल. त्यानंतर 10 मार्च रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत.