Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Blog : “म्हणून कधीकाळी समर्थक होतो.. हेही सांगावेसे वाटत नाही..!”

सध्या पुन्हा एकदा अण्णा हजारे हे आंदोलनात सक्रीय होत आहेत. एकेकाळी महाराष्ट्र राज्य आणि केंद्रातील सत्तेला आव्हान देण्यासाठी सरसावणारे अण्णा आता पुन्हा एकदा सक्रीय झाल्याने उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण त्यांना वाईट शब्दात ट्रोल करीत आहेत. तर, केंद्रातील सत्ताधीश भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांनी अण्णांच्या वाईन विक्री विरुद्ध पुकारलेल्या आंदोलनास पाठींबा दिला आहे. अशावेळी एकेकाळी अण्णांचे समर्थक असलेल्या रवींद्र पोखरकर (संचालक, अभिव्यक्ती युट्युब चॅनेल, ठाणे) यांनी आपली मन की बात फेसबुकवर खुली केली आहे. ती सध्या ट्रेंडमध्ये आहे.

Advertisement

त्यांनी म्हटलेय की, “अण्णा, पूर्वी तुमच्या नावाआधी प्रिय, आदरणीय,सन्माननीय असं काही आदराने लिहायचो. आता तसं काही लिहावं असं वाटत नाही. म्हणून फक्त अण्णा लिहिलंय.. हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ऊन-वारा-पावसात आंदोलन करीत होते आणि मोदी सरकार त्यांच्याविरुद्ध अतिशय संतापजनक पद्धतीने वागत होते त्यावेळी त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तुम्ही उपोषणाला बसायला हवं होतात.. आधी ट्रम्पचे आगमन आणि त्यानंतर मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार पाडून होईपर्यंत लॉकडाऊन लावण्यास मोदींनी केलेला अक्षम्य विलंब आणि त्यानंतर अवघ्या चार तासांची मुदत देऊन लावलेला लॉकडाऊन,गोरगरीब लोकांची झालेली सारी ससेहोलपट,त्यानंतर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड आणि योग्य उपचारांअभावी लक्षावधी नागरिकांना नाहक गमवावा लागलेला जीव..या साऱ्या विरोधात तुम्ही उपोषणाला बसायला हवं होतात..”

Loading...
Advertisement

पुढे ते म्हणतात, “मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील बेरोजगारी भयावह संख्येने वाढलीय.अशा स्थितीतही केंद्र रिकामी असलेली लाखो पदे भरत नाहीये, त्याचेच अनुकरण राज्य करताहेत. या विरोधात तुम्ही उपोषणाला बसायला हवं होतात.. जात्यंधता आणि धर्मांधतेला ताकद देऊन या देशातील सामाजिक सलोख्याला सुरुंग लावण्याच्या मोदी-शहांच्या राष्ट्रविघातक धोरणाविरोधात तुम्ही उपोषणाला बसायला हवं होतात.. अण्णा,मागील सातआठ वर्षांतील अशी आणखी किमान दहा मोठी आणि देशव्यापी कारणं सांगता येतील कि ज्यासाठी तुम्ही उपोषणाला बसायला हवे होतात. त्यात तुमचं बलिदान झालं असतं तरी तुम्ही अमर झाला असतात.. परंतु तुम्हाला यापैकी काहीही दिसलं नाही.याविरोधात उपोषण तर सोडा,साधं काही निषेधात्मक बोलावं असंही तुम्हाला वाटलं नाही ! आणि महाराष्ट्र सरकारच्या वाईन विक्रीसारख्या तुलनेने किरकोळ मुद्द्यासाठी तुम्ही उपोषणाला बसता आहात ! भाजपचे सवंगडी बनून अजून किती अवमूल्यन करून घ्याल स्वतःचं ? कधीकाळी तुमचा समर्थक होतो हे आता कुणाला सांगावेसेही वाटत नाही हो अण्णा..”

Advertisement

Advertisement

Leave a Reply