Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’.., पगारात होणार बंपर वाढ…!

नवी दिल्ली : केंद्रिय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे. मोदी सरकारने गेल्या काही दिवसांत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness allowance), एचआरए (HRA) आणि टीए (TA) वाढवला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. ती म्हणजे, या कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ‘फिटमेंट फॅक्टर’नुसार ही पगारवाढ होणार असल्याचे सांगितले जाते..

Advertisement

‘फिटमेंट फॅक्टर’ म्हणजे…
‘फिटमेंट फॅक्टर’नुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार ठरवला जातो.. ‘फिटमेंट फॅक्टर’नुसार पगारात अडीच पट पगार वाढ केली जाते. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांचे वेतन भत्त्यांव्यतिरिक्त त्यांचे मूळ वेतन हे ‘फिटमेंट फॅक्टर’च्या आधारावर निर्धारित केले जाते. यापूर्वी 2016 मध्ये ‘फिटमेंट फॅक्टर’ वाढला होता. त्याच वर्षी सातवा वेतन आयोग लागू झाला. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 6 हजारांवरून थेट 18 हजार रुपयांवर गेले होते. या वर्षी सरकारकडून पुन्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (CG employees salary) पगारात मोठी वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ‘फिटमेंट फॅक्टर’ 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी होत आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचे ‘फिटमेंट फॅक्टर’ ठरवले जाणे अपेक्षित आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे ‘फिटमेंट फॅक्टर’ या महिन्यात वाढू शकते. फिटमेंट वाढल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन पुन्हा एकदा वाढणार आहे.

Loading...
Advertisement

पगार किती वाढेल?
सध्या केंद्रिय कर्मचाऱ्यांना ‘फिटमेंट फॅक्टर’नुसार 2.57 टक्के वेतन मिळते. आता ते 3.68 टक्के होणार असल्याची चर्चा आहे. सरकारला सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करायच्या आहेत. सरकार फिटमेंट फॅक्टर 3 पट वाढवू शकते. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18000 रुपयांवरून 21000 रुपये होणार आहे. सरकार सध्या ‘फिटमेंट फॅक्टर’वर अधिक लक्ष देत असल्याचे समजते.

Advertisement

अनिल देशमुख यांचा पाय आणखी खाेलात, सचिन वाझेने घेतलाय मोठा निर्णय..!
बोगस मास्तरांची जेलवारी पक्की.. शिक्षक भरती घोटाळ्यात महत्वाची माहिती समोर..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply