Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बोगस मास्तरांची जेलवारी पक्की.. शिक्षक भरती घोटाळ्यात महत्वाची माहिती समोर..!

पुणे : महाराष्ट्रात सध्या विविध घोटाळे समोर येत आहेत. सुरुवातीला म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा त्यानंतर टीईटी घोटाळा समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. अपात्र उमेदवारांच्या मूळ गुणांमध्ये वाढ करुन त्यांना पास करण्यात आले. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचेही समोर आले आहे.. टीईटी घोटाळ्यातून 7,900 बोगस शिक्षकांची (TET teachers) यादी पोलिसांनी पत्त्यांसह तयार केली आहे. ही यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. आतापर्यंत या शिक्षक भरती घोटाळ्यात 300 बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आरोपींनी उमेदवारांना पोस्टाने पाठवलेली 300 बनावट प्रमाणपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या प्रकरणात 7900 उमेदवारांना पात्र केल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सविस्तर अहवाल सरकारला सादर केला जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. त्यामुळे बोगस शिक्षकांची जेलवारी पक्की असल्याचे समजले जात आहे..

Loading...
Advertisement

पोलिस भरतीतही घोटाळा
दरम्यान, शिक्षक भरती घोटाळ्याची धूळ खाली बसते न बसते, तोच आणखी एक घोटाळा समोर आला आहे. राज्यातील पोलिस भरतीतही मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस भरतीत बनावट उमेदवारांचा शिरकाव झाला आहे. तब्बल 3 लाख रुपये मोजून परीक्षेला डमी उमेदवार बसवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या डमी उमेदवारांमागे ‘औरंगाबाद कनेक्शन’ असून, पोलिसांकडून मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येते..

Advertisement

यूपी निवडणूक : त्यांना कोण हरवणार त्यांचा रक्षक राम आहे.. असे कोणाबाबत म्हणाली कंगना
रोजगार संधी : CISF ने कॉन्स्टेबल पदांसाठी काढली बंपर भरती.. जाणून घ्या पात्रता नियम

Advertisement
Advertisement

Leave a Reply