Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अनिल देशमुख यांचा पाय आणखी खाेलात, सचिन वाझेने घेतलाय मोठा निर्णय..!

मुंबई : 100 कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणात राेज नवनवे खुलासे समोर येत आहेत.  दिवसेंदिवस राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यात आता या प्रकरणातील बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने ‘माफीचा साक्षीदार’ होण्याची तयारी दाखवली आहे.. याबाबत त्याने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) पत्र पाठवले आहे. त्यावर येत्या 14 फेब्रुवारीला ‘ईडी’ आपलं म्हणणं न्यायालयात मांडणार आहे. मात्र, वाझे याच्या या निर्णयामुळे अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

सचिन वाझे याने पत्रात म्हटले आहे, की 100 कोटी रुपये वसुलीप्रकरणात मला ज्ञात असलेली संपूर्ण वस्तुस्थिती सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास तयार आहे. ‘सीआरपीसी’च्या कलम ३०६, ३०७ नुसार मला माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घेण्याची मी तुम्हाला विनंती करतो..!

Loading...
Advertisement

ईडीसमोर दिलेल्या जबाबात सचिन वाझे याने सांगितले होते, की अनिल देशमुख यांनीच मला पोलिस दलात पुन्हा येण्याविषयी सुचवले. राज्य सरकारमधील अनेक वरिष्ठ नेते त्यासाठी तयार नव्हते. मात्र, मी त्यांना समजावेन, असे देशमुख यांनी मला सांगितले. तसेच पोलिस दलात पुन्हा येण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणीही देशमुख यांनी केली होती. परंतु, इतके पैसे मला देणे शक्य नव्हते. तसे मी देशमुख यांना कळवले होते. मात्र, त्यानंतरही देशमुख यांनी मला परमबीर सिंह यांच्याकडे पोलिस दलात पुन्हा रुजू होण्यासाठी विनंती अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर मी अनिल देशमुख यांनी सांगितल्यानुसार पोलिस दलात पुन्हा रुजू झाल्याचे वाझे याने ‘ईडी’ला सांगितले होते.

Advertisement

दररोज त्याच त्याच जेवणाचा आलाय का कंटाळा.. बनवा व्हेज कोल्हापुरी.. ही घ्या सोपी रेसिपी
खास मुलांसाठी बनवा ब्रेड पिझ्झा रोल.. बाहेरचे जेवण जातील विसरून

Advertisement
Advertisement

Leave a Reply