Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारतीय क्रिकेटमध्ये ‘रोहित पर्वा’ला सुरुवात.. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकली..!

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात ‘टीम इंडिया’ने वेस्ट इंडिज संघावर 44 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या विजयासह भारतीय क्रिकेटमध्ये ‘रोहित पर्वा’ला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तिसरा सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे..

Advertisement

वेस्ट इंडिजचा नियमित कॅप्टन कायरन पोलार्ड याच्या गैरहजेरीत आज निकोलस पुरन याने संघाची कमान सांभाळली. टॉस जिंकत त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर अल्झारी जोसेफ व ओडियन स्मिथ यांच्या तिखट माऱ्यासमोर भारतीय संघाचे फलंदाज टिकू शकले नाहीत.

Advertisement

सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी (64 धावा) करताना एकाकी झुंज दिली. त्याला के. एल. राहुलने (49) चांगली साथ दिली.. मात्र, कॅप्टन रोहित, विराट, पंतसह इतर सगळ्यांनीच खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले.. कसातरी भारताचा डाव 50 षटकांत 9 बाद 237 धावांपर्यंत पोहोचू शकला.

Advertisement

वेस्ट इंडिजचा संघ अगदी सहज हे लक्ष्य गाठेल, असे वाटत होते. त्यांच्या सलामीवीरांनी डावाची सुरुवातही मोठ्या झोकात केली. मात्र, भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा बाॅलिंगला आल्यावर वेस्ट इंडिजच्या बॅटिंग लाईनला गळती लागली. खेळपट्टीवरील बाऊन्सचा याेग्य फायदा घेताना, प्रसिद्धने 9 षटकांत अवघ्या 12 धावा देताना 4 बळी टिपले.

Loading...
Advertisement

शार्दुल ठाकूरने दोन, तर सिराज, चहल, सुंदर व दीपक हुड्डा यांनीने प्रत्येकी एक विकेट घेतली. विंडीजचा सगळा संघ 46 षटकांत 193 धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजकडून शामराह ब्रुक्सने सर्वाधिक (44) धावा केल्या. मात्र, इतर फलंदाज करिश्मा दाखवू शकले नाहीत. प्रसिद्ध कृष्णाला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

पूर्ण वेळ कॅप्टन म्हणून रोहित शर्मा याच्यासाठी ही पहिलीच मालिका आहे. मात्र, त्याचे सगळे डावपेच पहिल्या दोन्ही सामन्यांत दिसून आले.. दुसऱ्या सामन्यात तर कमी धावसंख्या असतानाही त्याने सतत गोलंदाज नि फिल्डिंगमध्ये बदल केले. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला डोके वर काढण्याची संधीच मिळाली नाही..

Advertisement

दररोज त्याच त्याच जेवणाचा आलाय का कंटाळा.. बनवा व्हेज कोल्हापुरी.. ही घ्या सोपी रेसिपी
अरे वा.. आता स्कूटर खरेदीवरही मिळतोय जबरदस्त कॅशबॅक.. ‘या’ कंपनीने सुरू केलीय खास योजना

Advertisement
Advertisement

Leave a Reply