अहमदनगर : राज्य सरकारने 27 जानेवारी रोजी राज्यातील सुपर मार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समधून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला. साधारण एक हजार चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वायनरी चालते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन विक्रीचा निर्णय घेतल्याचे ठाकरे सरकारने जाहीर केले होते. सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपने मोठ्या प्रमाणात टीका केली.. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही राज्य सरकारला पत्र पाठवून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र, अण्णा हजारे यांच्या पत्राला सरकारने कोणतेही उत्तर न दिल्याने हजारे यांनी येत्या 14 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
अण्णा हजारे यांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे, की राज्यातील मुलेच आमची खरी संपत्ती आहे. या बालकांमधूनच उद्याचे महापुरूष निर्माण होणार आहेत. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही युवा शक्तीच राज्य आणि राष्ट्र घडवू शकेल, यावर आमचा विश्वास आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयामागे सरकारने फक्त महसुलाचा मर्यादित विचार केल्याचे दिसते.
ज्या सत्तेमध्ये समाज, राज्य, राष्ट्र हिताचा विचार नसेल, अशी सत्ता काय कामाची? ज्यांनी राज्य चालवायचे आहे, त्यांनी जनतेचा सल्ला न घेता आपल्या मनाला जे योग्य वाटते असे निर्णय घेणे म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाही ही लोकांची आहे. ती लोकांची, लोकांनी, लोकसहभागातून चालविली पाहिजे, अन्यथा इंग्रजांच्या आणि आमच्या हुकूमशाहीत फरक राहणार नाही.. असे अण्णा हजारे आपल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांनी थेट उपोषणाचे हत्यार उचलल्याने राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे..
Propose Day 2022 : नाहीतर होईल बट्ट्याबोळ..! प्रपोज करताना अशी घ्या काळजी
सरकारने टेस्लाला फटकारले..! कंपनीचा ‘तो’ प्लान यशस्वी होऊ देणारच नाही; पहा, काय आहे कंपनीचा प्लान ?