Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘अ‍ॅमेझॉन’ नि ‘फ्लिपकार्ट’पेक्षाही ‘येथे’ मिळतात सर्वात स्वस्त वस्तू.. दर्जाही उत्तम..

मुंबई : ‘अ‍ॅमेझॉन’ नि ‘फ्लिपकार्ट’ ही सध्याच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय ‘ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म’.. भारतात सर्वाधिक खरेदी या दोन प्लॅटफाॅर्मवरच होत असल्याचे दिसून येते.. मात्र, या दोन्ही ‘ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म’पेक्षाही असे एक पोर्टल आहे, जेथे ग्राहकांना स्वस्तात मस्त वस्तू मिळतात. शिवाय दर्जाच्या बाबतीत या वस्तू तसूभरही कमी नसल्याचे समोर आले आहे.. कारण हे पोर्टलच सरकारी आहे.. या सरकारी पोर्टलमुळे ‘अ‍ॅमेझॉन’ नि ‘फ्लिपकार्ट’चेही धाबे दणाणले आहे..

Advertisement

‘ई- मार्केट प्लस जेईएम’ (Government e-Marketplace portal- GeM), असे या सरकारी पोर्टलचे नाव.. इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपेक्षा स्वस्त नि टिकाऊ वस्तू या पोर्टलवर मिळाल्याचे समोर आले आहे. विविध वस्तूंच्या किंमतीची तुलना अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट (Amazon, Flipkart) सारख्या लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंमतींशी करण्यात आली असता, ‘जीईएम’च्या किंमती अ‍ॅमेझॉनसह फ्लिपकार्टपेक्षा 9.5 टक्के कमी असल्याचे 2021-22 मधील आर्थिक सर्वेक्षण (economic survey) विश्लेषणात समोर आले आहे..

Advertisement

22 पैकी 10 वस्तू स्वस्त
इतर दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपेक्षा नमुना पद्धतीने घेण्यात आलेल्या 22 पैकी 10 वस्तूंच्या किंमती ‘जीईएम’ पोर्टलवर स्वस्त असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. ‘जीईएम’ला अधिकाधिक लोकाभिमूख केल्यास, या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला तगडा प्रतिस्पर्धी तयार होऊ शकतो. त्या दृष्टीने केंद्र सरकार पाऊले टाकणार असून, ‘जीईएम’च्या किंमती कमी असल्याने ग्राहक आपोआप या प्लॅटफॉर्मकडे वळतील, अशी आशा आहे. विशेष म्हणजे, या प्लॅटफॉर्मवर किंमती कमी असल्या, तरी वस्तूंच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड केली जात नसल्याचे सांगण्यात आले..

Loading...
Advertisement

सरकारने 2016 मध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या खरेदीसाठी ‘जीईएम’ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्थापना केली. खरेदीसाठी ही एक सोपी, पारदर्शक आणि पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया आहे. जनरल फायनान्शियल रूल्स (financial Rules) 2017 नुसार सर्व मंत्रालये आणि विभागांना ‘जीईएम’कडून उपलब्ध वस्तू आणि सेवा खरेदी करणे बंधनकारक असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

वस्तुंच्या किंमतीत लक्षणीय घट
या ई-मार्केटप्लेसच्या वापरामुळे वस्तुंच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. सरासरी बाजारभावापेक्षा या ई-कॉमर्स पोर्टलवरील वस्तुंच्या किंमती 15 ते 20 टक्के, तर काही ठिकाणी 56 टक्क्यांपर्यंत वस्तुंच्या किंमती कमी झाल्याचे सर्वेक्षणातून दिसले. जागतिक बँकेने (World Bank) केलेल्या ‘जीईएम’च्या किंमतींचा पडताळा केला असता, आर्थिक सर्वेक्षणाशी तो सुसंगत असल्याचे दिसून आले. फेब्रुवारी 2019 ते जानेवारी 2020 दरम्यानच्या कालावधीसाठी सरासरी किंमतीवर ‘जीईएम’ या ई-कॉमर्स पोर्टलवर ग्राहकांची सरासरी 9.75 टक्के बचत झाली. या पोर्टलवर पहिल्या पाच श्रेणीतील वस्तुंच्या किंमतीवर 23.5% ते 60.5% पर्यंत बचतीचे उद्दिष्टय साध्य झाल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

खाद्यतेलही ठरू शकते आरोग्यास धोकादायक.. जाणून घ्या कोणत्या तेलाचे करावे सेवन
सोन्याच्या भावात पुन्हा वाढ.. पहा, आज एक तोळ्यासाठी किती आहे सोन्याचा भाव..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply