Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून ऑनलाईन हाॅल तिकीट मिळणार.. असे करा डाऊनलोड..!

मुंबई : दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यावरून सध्या राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. काॅलेज आणि शाळा ऑनलाईन (Online) पध्दतीने झाल्या, मग परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच राज्यभर विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलनही केले होते. एकीकडे असे सगळे गोंधळाचे वातावरण असतानाच, आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकीट देण्यास सुरुवात होणार आहे..

Advertisement

ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून बोर्डावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोर्ड आपल्या निर्णयावर ठाम आहे.. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर बोर्डाच्या परीक्षेसाठी आजपासून हॉलतिकीट देण्यास सुरुवात होणार आहे.. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट आहे..

Advertisement

कोरोना महामारीचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळेच यंदाची परीक्षा ऑनलाईन घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. मात्र, दहावी- बारावीच्या परीक्षांच्या तारखा याआधीच जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेचे नियोजन करण्यास पुरसा वेळ मिळाला असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे.

Loading...
Advertisement

बारावीच्या मार्च- एप्रिल २०२२ परीक्षेचे ऑनलाइन हॉलतिकीट सर्व विद्यार्थ्यांना आज (ता. 9) दुपारी 1 वाजेपासून कॉलेज लॉग इनमध्ये उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयांनी हॉल तिकीट डाऊनलोड करून प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 4 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत लेखी परीक्षा होणार असल्याचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले आहे.

Advertisement

विद्यार्थ्यांना हॉल तिकीट www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कॉलेज लॉगइन मध्ये डाऊनलोड करता येणार आहे. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास महाविद्यालयांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधायचा आहे. हॉलतिकीट देण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, अशी स्पष्ट सूचना मंडळाने केल्या आहेत. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांचा शिक्का व स्वाक्षरी घ्यायची आहे.

Advertisement

Corona Update : आता देशात कमी होतोय कोरोना; पहा, 24 तासात किती नवे रुग्ण सापडलेत..?
मॅगीइतक्याच वेळात तयार होईल मग पास्ता.. ही आहे झटपट रेसिपी

Advertisement
Advertisement

Leave a Reply