Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खाण्याचे वांदे…! मसाल्याच्या किंमतीही सामान्यांच्या आवाक्याबाहेर.. कशामुळे झालीय दरवाढ..?

मुंबई : भारतीय आहारात मसाल्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. मसाल्यांशिवाय पदार्थाची कल्पनाही करु शकत नाही.. बाजारात विविध कंपन्यांचे पाकिट बंद मसाले अगदी 10 रुपयांपासून विकले जातात. उन्हाळ्याची चाहूल लागताच, महिला वर्ग वर्षभरासाठी मसाले तयार करण्याच्या कामाला लागतो. मात्र, आता जेवणाला मसाल्याची फोडणी देण्यासाठी खिशाला आणखी झळ बसणार आहे.. कारण, वाढत्या महागाईत मसाल्याच्या किंमतीतही 20 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महागाईत आणखी भर पडली आहे..

Advertisement

उन्हाळ्यात महिला वर्ग वर्षभराचे मसाले तयार करीत असल्याने या दिवसांत मसाल्याला मागणी जास्त असते. त्यामुळे या काळात तसेही मसाल्याचे दर चढेच असतात. याच वेळेत मसाले वाळवून कुटले जातात. मात्र, यंदा मागणी जास्त असल्याने मसाल्यांच्या वस्तूंमध्ये दरवाढ झाल्याचे दिसत आहे.. भारतात विविध प्रकारचे मसाले तयार होतात. मात्र, सिंगापूर, इंडोनेशिया येथून भारतात मसाल्याचे पदार्थ फूल, धने, जिरे येतात. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ झाल्याने त्याचा परिणाम मसाल्याच्या किंमतीवर झाल्याचे किराणा व्यापारी सांगतात.

Advertisement

मसाला तयार करण्यासाठी लागणारी हळद, जिरे, फुल आदींची आवक मागील पाच ते सहा महिन्यांत घटली आहे.. त्यातच महागाईने कळस गाठला असून, हमालीचे दरही वाढले आहेत. परिणामी मसाल्याच्या वस्तू महाग झाल्या आहेत. खरेदीसाठी दुकानावर आलेले ग्राहक मसाल्याच्या किंमती ऐकूनच अचंबित होतो.

Loading...
Advertisement

मसाल्याचे भाव (कंसात जूने दर)
हळद  – 110 रुपये (80 रुपये), जिरे -230 (180), धने – 140 (130), फूल -800 (650 रुपये).

Advertisement

मसाला तयार करायचा, तर त्याला लाल मिरची लागते. पांडी, कश्मिरी, बेडगी, साधी अशा विविध प्रकारच्या मिरच्या पश्चिम महाराष्ट्रातून येतात. त्याच बरोबर सगळ्यात जास्त माल हा उत्तर महाराष्ट्रातील नंदूबारमधून येतो. काही मिरच्या कर्नाटकातून येत असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

खाद्यतेलही ठरू शकते आरोग्यास धोकादायक.. जाणून घ्या कोणत्या तेलाचे करावे सेवन
जगात अजूनही कोरोनाचे थैमान सुरुच..! पहा, जगातील कोणत्या देशात आहेत सर्वाधिक रुग्ण..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply