Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. तर पेट्रोल, डिझेल, सीएनजी मिळणार मोफत.. पहा, कुणी दिलेय ‘हे’ मोठे आश्वासन..?

Please wait..

दिल्ली : अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. समाजवादी पक्षाने आपल्या जाहीरनाम्याला वचन पत्र असे नाव दिले आहे. समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास सर्व पिकांवर एमएसपी निश्चित केला जाईल, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 15 दिवसांत पैसे दिले जातील. 4 वर्षात सर्व शेतकरी कर्जमुक्त होणार. शेतकऱ्यांना 2 पोती डीएपी खत आणि 5 पोती युरिया मोफत देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर या जाहीरनाम्यात दुचाकी चालकांना दरमहा एक लिटर पेट्रोल, ऑटो चालकांना दरमहा तीन लिटर पेट्रोल किंवा सहा किलो सीएनजी मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement

अर्र.. उत्तर प्रदेश निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री; ‘त्या’ मुद्द्यावर भाजपने अखिलेश यादव यांच्यावर केलीय जोरदार टीका..

Advertisement
ब्लेंडरदायी व्हा.. आरोग्यदायी राहा.. आपल्या प्रेमळ व्यक्तीला भेट पाठवण्यासाठी https://bit.ly/3GAOOCa यावर क्लिक करा

 

Advertisement
Loading...

या जाहीरनाम्यात सर्व पिकांसाठी एमएसपी देण्यात येईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 15 दिवसांत पेमेंट करण्यात येईल, सर्व शेतकऱ्यांना चार वर्षांत म्हणजे 2025 पर्यंत कर्जमुक्त केले जाईल, 2 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दोन पोती DAP आणि 5 पोती युरिया मोफत देण्यात येईल, सर्व शेतकर्‍यांना सिंचनासाठी मोफत वीज, बिनव्याजी कर्ज आणि विमा-पेन्शनची व्यवस्था केली जाईल. सर्व BPL कुटुंबांना दरवर्षी 2 LPG सिलिंडर मोफत मिळणार, दुचाकी मालकांना दर महिन्याला एक लिटर पेट्रोल दिले जाईल आणि ऑटो रिक्षांना तीन लिटर पेट्रोल किंवा 6 किलो सीएनजी मोफत मिळेल, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण दिले जाईल, केजी ते पीजी पर्यंत मुलींचे शिक्षण मोफत केले जाईल.

Advertisement

समाजवादी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली जाईल. या अंतर्गत गरजू महिला आणि बीपीएल कुटुंबांना दरवर्षी 18000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ 1 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहे, समाजवादी कॅन्टीन आणि किराणा दुकान सुरू करणार, एका वर्षाच्या आत सर्व गावे आणि शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोन निगराणी यंत्रणा, प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल स्कूलची स्थापना आणि विद्यापीठातील जागा दुप्पट करणार, विद्यार्थ्यांनी मोफत लॅपटॉप देणार, अशा घोषणा या जाहीरनाम्यात केल्या आहेत.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply