Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ.. पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत कंपन्यांचा मोठा निर्णय..!

मुंबई : इंधन दरवाढीमुळे वैतागलेल्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.. जागतिक कमाॅडिटी बाजारात सध्या कच्च्या तेलाचा भाव 7 वर्षांच्या उच्चांकावर गेलाय. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांचा तेलाची आयात करण्याचा खर्च वाढला आहे.. सध्या कच्च्या तेलाचा भाव 93 डाॅलरवर गेलेला असतानाही पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ रोखून धरली आहे. कंपन्यांनी आज (ता. 7 फेब्रुवारी) पेट्रोल आणि डिझेलचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला होता..

Advertisement

दरम्यान, आज सलग 95 व्या दिवशी देशातील प्रमुख चार महानगरांतील इंधनाचे दर स्थिर आहेत. मुंबईत आज पेट्रोलचा भाव 109.98 रुपये लिटरवर स्थिर आहे. दिल्लीत 95.41 रुपये, चेन्नईत 101.40 रुपये, कलकत्यात 104.67 रुपये, तर भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव 107.23 रुपये लिटरवर कायम आहेत. दुसरीकडे एक लिटर डिझेलसाठी मुंबईकरांना 94.14 रुपये मोजावे लागत आहेत.. दिल्लीत 86.67 रुपये, चेन्नईत 91.43 रुपये, कलकत्यात 89.79 रुपये, तर भोपाळमध्ये डिझेलचे भाव 90.87 रुपये प्रति लिटर आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, सिंगापूरमध्ये आज (सोमवारी) ब्रेंट क्रूडचा भाव 60 सेंट्सने वाढून प्रती बॅरल 93.87 डॉलरवर गेला. वेस्ट टेक्सासमध्ये कच्च्या तेलाचा भाव 25 सेंट्सने वाढला. तो 92.56 डॉलर प्रती बॅरल झालाय. रशिया व युक्रेनमधील तणाव वाढल्याने तेलाचे उत्पादन नि पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे मागील महिनाभरात तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. 1 डिसेंबर 2022 पासून कच्च्या तेलाचा भाव 32 टक्क्यांनी वाढला आहे. प्रति बॅरेलमागे 22 डॉलरची वाढ झाली आहे.

Advertisement

डिजिटल चलन : केंद्र सरकारचे डिजिटल वॉलेट पुढील वर्षी येणार.. काय असेल वेगळेपण
ओव्हनशिवायही घरी बनवता येतो स्वादिष्ट आणि हेल्दी पिझ्झा.. जाणून घ्या रेसिपी

Advertisement
Advertisement

Leave a Reply