Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अ‍ॅपलची इलेक्ट्रिक कार येणार..! कारमध्ये असणार ही खास वैशिष्ट्ये…

मुंबई : अ‍ॅपल कंपनी म्हणजे दर्जेदार वस्तूची हमी.. प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये या कंपनीने आपले वेगळेपण जपले आहे.. या कंपनीची उत्पादने काहीशी महाग वाटत असली, त्याची ती दर्जेदार असल्याने एक वेगळा वर्ग नेहमीच या कंपनीच्या उत्पादनांना पसंती देत आला आहे.. इलेक्ट्राॅनिक तंत्रज्ञानात आपला ठसा उमटविल्यानंतर अ‍ॅपल कंपनी आता वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहे.. ती म्हणजे, इलेक्ट्रिक कारवर ही कंपनी काम करीत असून, या कारमध्येही तंत्रज्ञानाचा एक वेगळा अविष्कार पाहायला मिळणार आहे. या कारचं सनरूफ (Sunroof) अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असेल. विशेष म्हणजे या सनरूफ तंत्रज्ञानाचं पेटंटही कंपनीनं मिळवल्याचं समजतं. प्रवासादरम्यान हे सनरूफ गरजेनुसार अ‍ॅडजेस्ट करता येणार आहे.

Advertisement

अ‍ॅपल कंपनी सध्या इलेक्ट्रिक कारवर काम करीत आहे. अर्थात, कंपनीने या प्रोजेक्टविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. एका वैशिष्टपूर्ण इलेक्ट्रिक कारवर अ‍ॅपल कंपनी काम करीत आहे. त्यात सेल्फ ड्रायव्हिंगसह (Self Driving) अनेक खास फिचर्स असतील, असं सांगितलं जात आहे.. आजपर्यंत अ‍ॅपलच्या अनेक तंत्रज्ञानांचं पेटंट त्यांच्याकडे होतं. पण कंपनीने जे नवीन पेटंट घेतलं आहे, ते स्मार्टफोनचं नसून इलेक्ट्रिक कारशी संबंधित असल्याचे सांगण्यात आलं.

Advertisement

अ‍ॅपलच्या इलेक्ट्रिक कारच्या सनरूफ तंत्रज्ञानाला ‘यूएस पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस’कडून मंजुरी मिळालेली आहे. या ब्रँडच्या सनरूफ पेटंटनुसार, त्यात ऑप्टिकल ग्लास (Optical Glass) असेल. कार चालवणारा ड्रायव्हर सनरूफची पारदर्शकता अ‍ॅडजेस्ट करू शकेल. सनरूफचा वापर कसा करायचा, हे ड्रायव्हरच्या हातात असेल. कारमध्ये फक्त सूर्यप्रकाश हवा आहे की ताज्या हवेसाठी संपूर्ण सनरूफ उघडायचे, हे ड्रायव्हर ठरवू शकतील. विशेष म्हणजे कारचं हे सनरूफ तुम्ही Apple CarPlay किंवा Siri च्या माध्यमातून वापरू शकणार आहात, असं मीडिया अहवालांमधून समोर आलं आहे.

Loading...
Advertisement

सध्याच्या कारमध्ये फिक्स्ड सनरूफ तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मात्र, अ‍ॅपलच्या पेटंटनुसार, या कारमधील सनरूफ हे साईड विंडोजबरोबर उघडणार आहे. अ‍ॅपल कार चालवताना, तुम्ही कारचं सनरूफ तुमच्या गरजेनुसार अ‍ॅडजेस्ट करू शकाल. अ‍ॅपल सेल्फ -ड्रायव्हिंग व्हेईकल सिस्टीमवर (Self Driving Vehicle System) काम करीत असल्याचे सांगण्यात येतं. अ‍ॅपल कार बाजारात दाखल होण्यासाठी किमान तीन ते चार वर्षं लागणार असल्याचे बोलले जात आहे..

Advertisement

Propose Day : मुलीला प्रपोज करण्यापूर्वी घ्या या 10 गोष्टींची विशेष काळजी
आयपीएलमुळे पाकिस्तानला बसला झटका.. ‘या’ माजी खेळाडूने PSL स्पर्धा अर्धवट सोडली..

Advertisement
Advertisement

Leave a Reply